________________
गुरु-शिष्य
दादाश्री : असे आहे की, स्वतःच जर रत्नपारखी असेल तर त्यांचे डोळे पाहूनच ओळखेल. त्यांची वाणी, वर्तन आणि विनय मनोहर असते. मनाचे हरण होईल असे असते. आपल्याला वाटते की ओहोहो! आपल्या मनाचे हरण होत आहे.
प्रश्नकर्ता : कित्येक वेळा गुरूंचा-सद्गुरूंचा व्यवहार असा असतो की तो पाहून मनुष्याचा निश्चय डगमगू लागतो, तर त्यासाठी काय करावे?
दादाश्री : व्यवहार पाहून निश्चय डगमगू लागला तर बारकाईने चौकशी करावी की आपली शंका खरी आहे की खोटी. स्वत:च्या बुद्धीचा वापर करुन जितके पडताळून पाहता येईल तितके पाहा. तरी सुद्धा जर तुम्हाला अनुकूल वाटत नसेल तर तुम्ही दुसऱ्या दुकानात जावे पण त्यांना त्रास न देता. आपण दुसरे दुकान (गुरू) शोधावे, तिसरे दुकान शोधावे, असे करता करता कधीतरी योग्य दुकान सापडेल.
प्रश्नकर्ता : परंतु आमचा विकास झाल्याशिवाय आम्ही सद्गुरूंना कसे ओळखू शकू?
दादाश्री : आपण आधीच त्यांना विचारायचे की, 'साहेब, मला व्यापार नको आहे. मला मुक्तीची गरज आहे. तेव्हा आपण मुक्त झाला असाल तर मी येथे आपल्या सेवेसाठी बसू का? त्यात काय हरकत आहे ?' परंतु कोणी असे सांगणारा आहे की, 'मी तुम्हाला मुक्ती देईन?' तेव्हा मग साक्षी-बिक्षीची गरजच नसते.तुम्ही लगेच त्यांना सांगा की, 'मी सहा महिने तुमच्याजवळ बसेन आणि तुमच्या म्हणण्यानुसार वागेन आणि फळप्राप्ती झाली नाही तर इथून निघून जाईन.' परंतु असे कोणी बोलणार नाही, या जगात असे कोणी बोलणारच नाही. विचारण्यास काय हरकत आहे ? ! 'साहेब आपली मुक्ती झाली असेल तर मला सांगा. मला मुक्ती हवी आहे. मला दुसरी स्टेशन्स (स्थानके) परवडत नाहीत. मला मधले स्टेशन नको.' असे स्पष्टच सांगा. मग ते म्हणतील, 'भाऊ, मीच मधल्या स्टेशनवर उभा आहे.' तेव्हा आपण समजू ना की आपल्याला मधले स्टेशन नको. म्हणजे अशा त-हेने शोधले तरच सापडेल, नाही तर