________________
३०
गुरु-शिष्य
आहे हे लक्षात नाही का येणार ? ताप चढलेली स्थिती आणि ताप उतरलेली स्थिती समजेल की नाही ? दृष्टीत बदल झाला आहे की नाही, हे समजणार नाही का ? समकित म्हणजेच दृष्टीबदल ! कदाचित अपवाद असतो, एखाद्यासाठीच अपवाद असतो. पण येथे आम्ही अपवादाची चर्चा करीत नाही, आम्ही सगळी सामान्य चर्चा करीत आहोत.
प्रश्नकर्ता : सद्गुरूंची जी वचने आहेत, त्यांचा आधार घेऊन काही पुरुषार्थ केला तर तो मनुष्य प्राप्ती करू शकतो ना ?
दादाश्री : त्याने काहीही निष्पन्न होत नाही ना ! मग तर कृपाळुदेवांचे वाक्य खोडून टाका की 'सजीवन मूर्तीच्या लक्ष्यशिवाय जे काही केले जाते ते जीवासाठी बंधनकारकच असते. हे आमचे हृदय आहे.' हे किती मोठे वाक्य आहे! तरी सुद्धा लोक जे काही करतात ते चुकीचे नाही. 'हे तुम्ही जे काही करीत आहात ते चुकीचे आहे, आणि त्यामुळे मोक्ष मिळणार नाही,' असे जर आम्ही सांगितले तर तो इतरत्र पत्ते खेळण्यासाठी निघून जाईल. चुकीच्या मार्गावर चालू लागेल. त्यापेक्षा तर तो जे काही करत आहेत ते चांगलेच आहे. पण कृपाळुदेवांनी सांगितल्यानुसार चाला. प्रत्यक्ष सद्गुरू हुडकून काढा !
कृपाळुदेवांनी तर पुष्कळ जोर देऊन सांगितले आहे की, सजीवन मूर्तीशिवाय काहीही करू नका. तो स्वछंद आहे, निव्वळ स्वछंद आहे ! जो स्वत:च्याच शहाणपणाने पुढे चालत आहे, त्यास मोक्ष कधीच मिळणार नाही. कारण माथी कुणी वरिष्ठ नाही, माथी कोणी गुरू किंवा ज्ञानी नसेल तर मग काय होईल ? स्वछंद ! ज्याचा स्वछंद थांबेल त्याचा मोक्ष होतो, असाच काही मोक्ष होत नाही.
सर्वात उत्तम म्हणजे गुरूला विचारले पाहिजे, परंतु असे गुरू या काळात कुठून आणणार ? त्याऐवजी कोणत्याही एका व्यक्तीस गुरू बनवले तरी चालेल. तुमच्यापेक्षा मोठे असतील, तुमची काळजी घेत असतील आणि तुम्हाला वाटले की, माझे मन येथे स्थिरावते, तर तिथे तुम्ही बसा आणि स्थापना करा. कदाचित, त्यांच्यात एक-दोन चुका असतील तर