________________
२४
गुरु-शिष्य
मनाने मानलेले चालत नाही
प्रश्नकर्ता : गुरू नेमले पाहिजेत ही गोष्ट खरी आहे. पण आपल्या मनानेच कोणाला तरी गुरू मानले तर चालते का ?
दादाश्री : तसे काही चालणार नाही. सांगणारा त्याच्या समोर पाहिजे की तू ही चूक केली आहेस म्हणून. आणि जर मनाने मानून घ्या असे म्हणत असाल तर मग या बायकोला मनानेच मानून घ्या ना ! एका मुलीला पाहून मनातच माना की माझे लग्न झाले ! मग लग्न नाही केले तरी चालेल का ?
प्रश्नकर्ता : समजा कोणी गुरू परदेशात जाऊन तिथे कायमसाठी राहिले असतील व ते येथे परत येणारच नसतील आणि मला जर त्यांना गुरू मानायचे असेल तर मी त्यांचा फोटो ठेऊन त्यांना माझे गुरू मानू शकत नाही का ?
दादाश्री : नाही. त्याने काहीच निष्पन्न होणार नाही. गुरू म्हणजे, आपल्याला जे मार्ग दाखवतील ते गुरू. फोटो मार्ग दाखवत नाही. म्हणून ते गुरू कामाचे नाहीत. आपण आजारी असू आणि डॉक्टरचा फोटो आपल्या समोर ठेवून त्याचे ध्यान करीत राहिलो तर काय आजार बरा होईल ?
'आपले'
गुरू
कोण ?
प्रश्नकर्ता : दादाश्री तुम्हाला ज्ञान प्रकट झाले तेव्हा तुम्ही कोणाला गुरू मानले होते का ?
दादाश्री : आम्हाला कोणी प्रत्यक्ष गुरू तर भेटले नाहीत. वास्तवात गुरू कोणाला म्हणता येईल ? की जे प्रत्यक्ष भेटले असतील त्यांना. नाही तर हे सर्व फोटो तर आहेतच ना ! कृष्ण भगवंत प्रत्यक्ष भेटले तर कामाचे. नाही तर फोटो तर लोकांनी विकले आणि आम्ही ते सजवले ! आम्हाला या जन्मात कोणी डिसायडेड (ठराविक ) गुरू भेटले नाहीत, की हेच गुरू आहेत. गुरू जर प्रत्यक्ष असतील तर त्या प्रत्यक्ष गुरूला धारण करून सहा महिन्यात, बारा महिन्यात त्यां दोघांमध्ये गुरू-शिष्याचे नाते प्रस्थापित होते,