________________
गुरु-शिष्य
๕
पाहिजे. क्वचितच कोणी असे बोलेल की 'गुरूची गरज नाही.' गुरूशिवाय तर चालणारच नाही. गुरू म्हणजे तर प्रकाश म्हटला जातो. शेवटपर्यंत गुरू पाहिजेत. श्रीमद् राजचंद्रानी म्हटले आहे की बाराव्या गुणस्थानकापर्यंत गुरूची गरज पडेल, बारावे गुणस्थानक म्हणजे भगवंत होण्यापर्यंत गुरूची गरज पडेल.
प्रश्नकर्ता : गुरूंचा विरोध करण्यासाठी मी हा प्रश्न केला नाही. पण मला हे समजून घ्यायचे आहे.
दादाश्री : हो, पण गुरूची खास गरज आहे या दुनियेत. अजूनही माझे सुद्धा गुरू आहेतच ना! मी संपूर्ण जगाचा शिष्य होऊन बसलो आहे. म्हणजे माझे गुरू कोण? तर लोक! अर्थात गुरूची गरज तर शेवटपर्यंत आहे.
जी गोष्ट सत्य आहे, तिला सत्य म्हणायला काय हरकत आहे ! 'ज्ञानी पुरुष' तर, चुकीचे असेल तर लगेचच त्यास चुकीचे आहे असे सांगतात. मग तो राजा असो किंवा दुसऱ्या कोणीही असो! तुम्हाला ते मान्य नसेल तरीही माझी हरकत नाही पण मी हे चालू देणार नाही. मी तर साऱ्या जगाला सत्य सांगण्यासाठी आलो आहे. कारण आत्तापर्यंत पोलम्पोल चालली आहे, म्हणून तर हिंदुस्तानची ही दैनावस्था झाली आहे, पाहा तरी!
आम्ही गोष्टी गोल फिरवून बोलू शकत नाही. आता लोक काय शोधत असतात? तर पोकळ (काहीही) बोलून सुद्धा शांत राहायचे. पोकळ बोलूनही येथे गोंधळ उडाला नाही म्हणजे झाले! परंतु आमच्याकडून तसा एकही शब्द बोलला जाणार नाही. नाही तर आम्हाला तसेही बोलता येत होते पण नाही बोलू शकत. आम्हाला तर 'आहे त्याला आहे' सांगावे लागते व 'नाही त्याला नाही' सांगावे लागते. 'नाही त्याला आहे' असे म्हणू शकत नाही व 'आहे त्याला नाही' असेही म्हणू शकत नाही.
गुरू स्वत:च म्हणतात की 'गुरू करू नका,' मग तुम्ही कोण आहात या जागी? तसेच इकडे म्हणता, 'निमित्ताची गरज नाही' तेव्हा तुम्ही कोण आहात आता?