________________
गुरु-शिष्य
दादाश्री : नाही, मन तर भटकण्याचा रस्ता शोधून काढेल. तो काही खरा रस्ता नाही. म्हणूनच विचारावे लागेल, गुरू नेमावे लागतील. गुरू नेमून त्यांना विचारावे लागेल की मी कोणत्या रस्त्याने जाऊ ! म्हणजेच, गुरूशिवाय तर या दुनियेत, एवढे सुद्धा, इथून तिथपर्यंतही चालता येणार नाही.
शाळेत शिक्षक ठेवावे लागले होते की नाही ?
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : जिथे जाल तिथे शिक्षक पाहिजेतच. शिक्षकाची गरज कुठे पडली नाही ते मला सांगा ?
मग कॉलेजमध्ये प्रोफेसर हवेत की नकोत ?
प्रश्नकर्ता : हवेत.
दादाश्री : अर्थात, मनुष्यरूपात जन्म घेतला तेव्हापासून त्याच्या माथी गुरू हवा. शाळेत गेल्यावर सुद्धा गुरू हवा, कॉलेजात गेला तरी गुरू लागले. तिथे परत वेगवेगळे गुरू, मॅट्रिकमध्ये शिकत असेल तर त्याला मॅट्रिकचे गुरू पाहिजे, फर्स्ट स्टँडर्डचे गुरू तिथे उपयोगी पडणार नाही. म्हणजे गुरू सुद्धा वेगवेगळे असतात. प्रत्येकासाठी एकाच प्रकारचे गुरू नसतात. ‘कुठे शिकत आहात' त्यावर अवलंबून आहे.
८
मग पुस्तक वाचता तेव्हा पुस्तक हा तुमचा गुरू नाही का ? पुस्तक जर गुरू असेल तरच वाचणार ना? पुस्तक काही शिकवत असेल, काही लाभ होत असेल तरच वाचाल ना?
प्रश्नकर्ता : हो. बरोबर !
दादाश्री : पुस्तकांतून शिकता, त्या पुस्तकांमुळेच तुम्हाला लाभ झाला. एखाद्या पुस्तकाने तुम्हाला मार्गदर्शन केले तर त्यास गुरू म्हणतात. म्हणजे पुस्तक देखील तुमचा गुरू आहे.
शिक्षकांपासून, पुस्तकातून, मनुष्यांपासून तुम्ही शिकत आहात तर त्यांना गुरूच म्हटले जाईल. अर्थात सारे जग गुरूच आहे ना !