________________
नऊ कलमे १. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्म्याचा किंचितमात्र पण अहम् दुभावणार ( दुखावणार) नाही, दुभाविला जाणार नाही किंवा दुभावण्या प्रति अनुमोदन केले जाणार नाही अशी परम शक्ती द्या.
मला कोणत्याही देहधारी जीवात्म्याचा किंचितमात्र पण अहम् दुभावणार नाही अशी स्याद्वाद वाणी, स्याद्वाद वर्तन आणि स्याद्वाद मनन करण्याची परम शक्ती द्या.
२. हे दादा भगवान ! मला कोणत्याही धर्माचे किंचितमात्र पण प्रमाण दुभावणार नाही, दुभावले जाणार नाही किंवा दुभावण्या प्रति अनुमोदन केले जाणार नाही अशी परम शक्ती द्या.
मला कोणत्याही धर्माचे किंचितमात्र पण प्रमाण दुभावले जाणार नाही, अशी स्याद्वाद वाणी, स्याद्वाद वर्तन आणि स्याद्वाद मनन करण्याची परम शक्ती द्या.
३. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी उपदेशक, साधु, साध्वी किंवा आचार्य यांचा अवर्णवाद, अपराध, अविनय न करण्याची परम शक्ती द्या.
४. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्म्या प्रति किंचितमात्र पण अभाव, तिरस्कार कधीही केला जाणार नाही, करविला जाणार नाही किंवा कर्त्याच्या प्रति अनुमोदन केले जाणार नाही अशी परम शक्ती द्या.
हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्म्याशी कधीही कठोर भाषा, तंतीली ( टोचणारी) भाषा न बोलण्याची, न बोलावयाची किंवा बोलण्या प्रति अनुमोदन न करण्याची अशी परम शक्ती द्या.
कोणी कठोर भाषा, तंतीली भाषा बोलले तर मला मृदु-ऋजु भाषा बोलण्याची परम शक्ती द्या.