________________
१४६
गुरु-शिष्य
जगातील जीवमात्रांना मी गुरू मानतो, सगळ्या जगास मी गुरू मानतो. कारण जिथे कोणत्याही प्रकारचे सत्य असेल, एक कुत्रा जात असेल तर कुत्र्याचे सत्य सुद्धा स्वीकारतो. ज्याच्याजवळ आपल्यापेक्षा अधिक विशेषता असेल, त्याचा मी स्वीकार करतो. तुमच्या लक्षात आले ना?
प्रश्नकर्ता : म्हणजे की जिथून कुठलीही प्राप्ती होत असेल ते आपले गुरू असे?
दादाश्री : हो, अशा तहेने सगळेच माझे गुरू! म्हणून मी तर सगळ्या जगातील जीवमात्रांना गुरू बनवले आहे, गुरू तर बनवावेच लागतील ना? कारण ज्ञान तर सगळ्या लोकांजवळ आहे. प्रभू काही स्वतः येथे येत नाहीत. ते असे रिकामटेकडे नाहीत की तुमच्यासाठी येथे खेपा घालतील?
'या' शिवाय कोणतेही स्वरूप नाही प्रश्नकर्ता : यात आपण स्वतःस कोणत्या कोटीतले मानता?
दादाश्री : मी स्वत:ला संपूर्ण जगाचा शिष्य मानतो. आणि मी लघुत्तम स्वरूप आहे. याशिवाय माझे दुसरे कोणतेही स्वरूप नाही. आणि हे 'दादा भगवान' हे भगवान आहेत! आत प्रकट झाले आहेत, ते!
दिशा बदलण्याची गरज प्रश्नकर्ता : वर्तमानात भारतात आपल्या स्तराच्या दुसऱ्या विभूति आहेत का?
दादाश्री : मला कसे कळेल? ते तर तुम्ही शोध घेत आहात, तर तुम्हाला कळेल. मी शोध घेण्यास गेलो नाही.
प्रश्नकर्ता : आपण शिखरावर आहात, म्हणून दिसत असेल ना?
दादाश्री : पण मी ज्या शिखरावर आहे, त्यापेक्षा दुसरे कुठले शिखर मोठे असेल तर ते मला कसे समजणार? शिखरावर गेलेल्या प्रत्येकांनी असेच सांगितले आहे का की मीच अंतिम शिखरावर आहे ? परंतु मी असे सांगत नाही.