________________
गुरु-शिष्य
१३७
भेटतील, परंतु त्यात तुमचे हित नाही. म्हणून या लाडीगोडीच्या गोष्टींचा नाद सोडा आता, निदान या एका जन्मापुरता तरी! आता अर्धे आयुष्यच उरले आहे ना! पूर्ण आयुष्य कुठे उरले आहे !!
प्योरिटीच पाहिजे प्रश्नकर्ता : आपण असे बोललात, दुसरे कोणी तर असे सांगतच नाही.
दादाश्री : हो. पण प्योर झाला असेल तरच बोलेल ना! त्याशिवाय तो कसा बोलेल? त्यांना तर या जगाची लालूच आहे आणि या जगातील सुखं हवी आहेत. ते काय बोलतील मग? म्हणून प्योरिटी असली पाहिजे. संपूर्ण जगाच्या गोष्टी आम्हाला द्याल तरी आम्हाला त्याची गरज नाही, संपूर्ण जगाचे सोने आम्हाला दिले, तरी सुद्धा आम्हाला त्याची गरज नाही, स्त्रीचा विचारच येत नाही. या जगात कोणत्याही प्रकारची भीक आम्हाला नाही. शुद्ध आत्मदशा साधणे ही काय सोपी गोष्ट आहे ?
प्रश्नकर्ता : म्हणजे कुठल्याही गुरूचे व्यक्तीगत चारित्र्य शुद्ध असले पाहिजे?
दादाश्री : हो. गुरूचे चारित्र्य संपूर्ण शुद्ध असले पाहिजे. शिष्याचे चारित्र्य नसेल सुद्धा, परंतु गुरूचे चारित्र्य तर एक्जक्ट असले पाहिजे. गुरू जर बिनचारित्र्याचे असतील तर ते गुरूच नाहीत, त्याला काही अर्थच नाही. संपूर्ण चारित्र्य हवेत. ही अगरबत्ती चारित्र्यवान असते, एवढ्याशा खोलीत जरी पाच-दहा अगरबत्त्या लावल्या तर पूर्ण खोली सुगंधी होऊन जाते. तर मग गुरू बिनचारित्र्याचे चालतील का? गुरू तर सुगंधवाले असले पाहिजेत.
मोक्षमार्गात सर्वात मुख्य मोक्षमार्गात दोन गोष्टी नसतात. ते म्हणजे स्त्रीचे विचार आणि लक्ष्मीचे विचार! जिथे स्त्रीचा विचार असेल तिथे धर्म नसतो, लक्ष्मीचा विचार असेल, तरी तिथे धर्म नसतो. या दोन मायांमुळे संसार उभा राहिला आहे. हो, म्हणून तिथे धर्म शोधणे हे चुकीचेच आहे. मग सध्या लक्ष्मीशिवाय किती केंद्रे चालतात?