________________
१३०
गुरु-शिष्य
विषयविकार! या दोन्ही सर्वात मोठी माया आहे. ही माया असेल तिथे देव नसतो. आणि देव असेल तिथे माया नसते! ।
आणि पैसा शिरला मग किती प्रमाणात शिरेल याचा काही नेम नाही. असे काही नियम आहेत का येथे? म्हणून पैसा बिल्कुल, मुळापासूनच असता कामा नये. शुद्ध होऊन या! धर्मात मलिनता करु नका!
धर्माची काय दशा आहे आज! ___ मग हे सगळे फी ठेवतात, जणू नाटक असेल असे! नाटकासाठी फी ठेवतात, तशी येथेही फी ठेवतात. त्यात पाच टक्के चांगले सुद्धा असतात. बाकी तर सोन्याचा भाव वाढला, तसे यांचे' सुद्धा भाव वाढतात ना! म्हणून मला पुस्तकात लिहावे लागले की जिथे पैशाचे देणेघेणे आहे, तिथे भगवंत नाहीत आणि धर्म सुद्धा नाही. जिथे पैशांचे देणेघेणे नाही, व्यापारी वृत्तीच नाही, तिथे भगवंत आहेत ! पैसे, देणेघेणे ही व्यापारी वृत्ती म्हटली जाते.
सगळीकडे पैसे, जिथे जाल तिथे पैसे, जिथे जाल तिथे पैसे! सगळीकडेच फी, फी आणि फी! हो, मग त्या बिचाऱ्या गरीबांनी काय गुन्हा केला? फी ठेवली तर गरीबांसाठी असे म्हणा की, 'भाऊ, गरीब व्यक्तीकडून चार आणे घेईन, फार झाले,' मग गरीब सुद्धा तिथे जाऊ शकेल. हे तर फक्त श्रीमंतच लाभ घेतात. बाकी जिथे फी असेल, तिथे धर्मच नाही. तिथे धर्म नाहीच मुळी! आमच्या येथे एक पैसा सुद्धा घेतला जात नाही. येथे फी ठेवली तर काय दशा होईल? 'ज्ञान' घेण्यासाठी एकदा तर तुम्ही खर्च कराल, परंतु नंतर म्हणाल की आता या 'ज्ञानाला' मजबूतीने पाळू, पण आता पुन्हा फी देणार नाही. __आपण कुणाचे नाव घेणे, हे तर चुकीचे म्हटले जाईल. परंतु तुम्हाला ही रूपरेषा देत आहे की सद्या धर्माची काय दशा झाली आहे. गुरू की जे व्यापारी होऊन बसलेत, ते सगळे चुकीचे आहे. जिथे पॅक्टिशनर असतात, फी ठेवतात, की 'आज आठ-दहा रुपये फी आहे, उद्या २० रुपये फी आहे.' तर ते सगळे बेकार आहे.