________________
१२४
गुरु-शिष्य
ध्येय एका जागीच ठेवा, की हिंदुस्तानात जन्म झाला आहे तर मुक्तीसाठी साधना करावी. या एका ध्येयावर या तेव्हा सुटका होईल.
म्हणजे कोणत्याही प्रकारची भीक असता कामा नये. धर्मासाठी इतके दान द्या, अमके द्या, अशा अनुमोदनेत पडू नये. करणे, करवून घेणे आणि अनुमोदन करणे, हे तिथे नसावे. आम्ही तर सर्व प्रकारच्या भीकेपासून मुक्त झालो आहोत. मंदिर उभारण्याचीही भीक नाही. कारण आम्हाला ह्या जगातील कोणतीच गोष्ट नको आहे. आम्ही मानाचे भिकारी नाही, किर्तीचे भिकारी नाही, लक्ष्मीचे भिकारी नाही, सोन्याचे भिकारी नाही, शिष्यांचे भिकारी नाही. विषयांचे विचार येत नाहीत, लक्ष्मीचे विचार येत नाहीत. जिथे विचारच उत्पन्न होत नाहीत, मग तिथे भीक कोणत्या गोष्टीची असेल? मानाची, किर्तीची कोणत्याही प्रकारची भीक नाही.
आणि मनुष्यमात्रास किर्तीची भीक असते, मानाची भीक असते. आम्ही विचारतो, 'तुमच्यात किती भीक आहे, याचा तुम्हाला पत्ता लागतो का? तुमच्यात कोणत्याही प्रकारची भीक आहे का?' तेव्हा म्हणतील, 'नाही, भीक नाही.' अरे, आता अपमान केला तर लगेच कळेल की मानाची भीक आहे की नाही! ।
कदाचित स्त्री संबंधात ब्रह्मचारी झाला असेल, लक्ष्मीच्या बाबतीतही भीक सोडली असेल, परंतु किर्तीची भीक असते, शिष्याची सुद्धा भीक असते, नाव कमवण्याची भीक असते, सगळ्या अंतहीन भीक असतात. शिष्यांची सुद्धा भीक! म्हणतील, 'माझा कोणी शिष्य नाही' मग शास्त्रांनी काय सांगितले आहे ? जो येऊन ठेपेल, शोधल्याशिवाय, आपोआपच जो येईल तो शिष्य!!
भीकेपासून भगवंत दूर म्हणून मी 'भीक' शब्द लिहितो. दुसरे लोक भीक शब्द लिहित नाहीत. 'तृष्णा' लिहितात. अरे, भीक लिहा ना! तरच त्यांचा भिकारीपणा सुटेल. तृष्णाचा अर्थ काय? तृष्णा म्हणजे तहान. अरे, तहान लागली किंवा नाही लागली त्यात काय अडचण आहे ? अरे, ही तर तुझी भीक