________________
गुरु-शिष्य
कोणाची गोष्ट आणि कोणी धरली? चांगले आहे, त्या मार्गाने का असेना लोकांना सरळ तर करतात ना! पण तरी ते लोकांना घसरू देत नाहीत तेवढे चांगलेच आहे. बाकी, वर चढवण्याचा तर प्रश्नच नाही. कारण ते गुरू स्वतःच चढले नाहीत ना! चढणे ही काही सोपी गोष्ट आहे तेही या कलियुगात, दुषमकाळात? ही चढण तर खरोखर उभी चढण आहे. परंतु घसरू देत नाहीत. लोकांना दुसरे मिळत नाही, म्हणून कोणत्याही दुकानात जाऊन बसावे लागते ना! असेच अनंत जन्मांपासून भटकतच आहेत ना! प्रश्नकर्ता : एकीकडे असे म्हटले जाते की,
'गुरू गोविंद दोनों खडे, किसको लागूं पाय,
बलिहारी गुरू आपकी, जिसने गोविंद दियो बताय!' दादाश्री : हो. पण तसे गुरूदेव कोणाला म्हटले जाते? गोविंद दाखवतील, त्यांना गुरूदेव म्हटले जाते. असे यात सांगितले आहे. आता तर हे गुरू स्वतःचे गुरूपण स्थापित करण्याची गोष्ट करतात. परंतु आम्ही त्याना सांगितले पाहिजे की, 'साहेब, मी तुम्हाला गुरूदेव केव्हा म्हणेल? की तुम्ही मला गोविंद दाखवाल तर. हे लिहिले आहे त्यानुसार जर कराल तर, गोविंद दाखवा, तर तुमच्यात गुरूपण स्थापित करीन. तुम्हीच आतापर्यंत गोविंद शोधत आहात आणि मी सुद्धा गोविंद शोधतो आहे, तर आपल्या दोघांचा मेळ कसा बसेल?
बाकी, आज तर सगळे गुरू हेच समोर ठेवतात! गुरूंनी गोविंद दाखवले नसतील तरी सुद्धा असे गायला लावतात. जेणे करुन गुरूंना 'प्रसाद' तर मिळेल ना! या शब्दांचा दुसऱ्या दुकानदारांनाही लाभ होतो ना.(!)
प्रश्नकर्ता : परंतु त्यामुळे गुरूचे परडे अधिक वजनदार बनवले.
दादाश्री : आहेच वजनदार, पण तसे गुरू आतापर्यंत झाले नाहीत. हे तर प्रोबेशनर (हंगामी उमेदवार) गुरूंचे फावले आहे यात. म्हणजे प्रोबेशनर असे मानून बसले आहेत की, 'आता आम्ही गुरू आहोत, आणि देव दाखवले, मग तुम्ही आम्हाला पुजले पाहिजे.' परंतु