________________
गुरु-शिष्य
सुद्धा मदत करतील. जर गुरू महाराजांकडे असतील तर ते म्हणतील, 'भाऊ, घेऊन जा, माझ्याकडे आहेत' असे असले पाहिजे. गुरू म्हणजे हेल्पिंग-मदतकर्ता, आई-वडिलांपेक्षाही आमची विशेष काळजी घेतात, तर त्यांना गुरू म्हटले जाते. हे लोक तर बळकावतात. पाच-पन्नास-शंभर रुपये बळकावतात.
दुसऱ्यांसाठी जीवन जगत असतील असे गुरू असले पाहिजेत! स्वतःसाठी नाही.
नंतर गुरू जरा शरीराने सुदृढ असले पाहिजेत. दिसायला चांगले असावेत. दिसायला चांगले नसतील तरी कंटाळा येतो. 'येथे कुठे याच्याकडे येऊन बसलो? ते दुसरे गुरू तर किती सुंदर होते!' असे म्हणतात मग. दुसऱ्यांबरोबर अशी तुलना करणार नसाल तरच गुरू करा. गुरू करायचे असेल तर समजून-उमजून कर. गुरू फक्त करण्यासाठीच करावे, अशी गरज नाही.
आणि त्यांच्यात तर स्पृहाही नसते आणि नि:स्पृहता सुद्धा नसते. निःस्पृहता नसेल, तर काही स्पृहा आहे का? नाही, तुमच्या पौद्गलिक बाबतीत म्हणजे भौतिक बाबतीत निःस्पृह आहेत, आणि आत्म्याच्या बाबतीत ते स्पृहावाले आहेत. हो, संपूर्ण नि:स्पृह नाहीत ते!
__ गुरू असे असावेत की ज्यांना कुठल्याही प्रकारची इच्छा नसेल. त्यांना लक्ष्मी नको असेल आणि विषयविकारही नको असेल. त्या दोन्ही गोष्टींची त्यांना गरज नसते. मग सांगावे की, मी तुमचे पाय चेपीन, डोके चेपीन. पाय चेपण्यात आमची हरकत नाही. पाय चेपावे, सेवा करावी.
मोक्षाच्या मार्गावर तर त्यांचे गुरू आत्मज्ञानी असले पाहिजेत. आणि तसे आत्मज्ञानी गुरू नाहीतच, म्हणून तर सगळी केस बिघडून गेली आहे.
तेव्हा म्हणू शकतो, गुरू मिळाले म्हणून मी तर कुणाचे ऐकतच नव्हतो. कारण मला त्यांच्यात काही बरकत दिसत नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावर तेज दिसत नव्हते, त्यांच्याकडून