________________
गुरु-शिष्य
असेल की ज्याचा शब्द आपल्या (मनात) घर करून राहतो आणि तो बारा-बारा महिन्यांपर्यंत निघत नाही, विसरायला होत नाही, त्या उपदेशाची तर गोष्ट निराळी आहे. नाही तर ज्याचा उपदेश एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिला जातो, अशा उपदेशाची काही किंमतच नाही. तो उपदेश आणि पुस्तक हे दोन्ही सारखेच.
१०७
ज्याचा उपदेश आणि ज्याचे वाक्य, ज्याचे शब्द आपल्या आत बरेच महिने घुमत राहतात, अशा उपदेशाची अत्यंत गरज आहे. त्यास अध्यात्म विटामिनवाला उपदेश म्हटला जातो. तो क्वचितच असू शकतो. परंतु त्यासाठी ते स्वतः चारित्र्यवान असले पाहिजेत, व्यवहार चारित्र्यवान ! शीलवंत असले पाहिजेत की ज्यांचे दोष मंद झालेले असतील.
शब्दांच्या मागे करुणाच वाहते
बाकी, हे सगळे उपदेश देतात ना की, 'असे करा, तसे करा,' परंतु त्यांची वेळ आली की लगेच ते चिडून उभे राहतात. हे तर उपदेशाच्या गोष्टी करतात तेवढेच. वास्तविकरित्या उपदेश देण्याचा अधिकार कोणाला आहे ? जो चिडत नाही, त्यालाच उपदेश देण्याचा अधिकार ! हे तर समोरच्याने जरासे काही सांगितले की लगेच फणकारतात, 'माझ्यासारखा जाणकार, 'मी असा व मी तसा' म्हणजे भ्रांतीतच बोलत राहतो, 'मी, मी, मी, मी,...' म्हणूनच काही सुधारत नाही ना !
हा तर वीतराग मार्ग म्हटला जातो. पुष्कळच जोखमदारीचा मार्ग ! एक शब्द सुद्धा बोलणे खूप जोखमीची वस्तू आहे. उपदेशकांना तर आता खूप जबाबदारी आहे. परंतु लोक समजत नाहीत, जाणत नाहीत, म्हणून उपदेश करतात. तेव्हा आता तुम्ही उपदेशक आहात की नाही, ते तुम्ही स्वत:च पारखून पाहा. कारण उपदेशक आर्तध्यान- रौद्रध्यानापासून मुक्त असला पाहिजे. शुक्ल ध्यान झाले नसेल तरीही हरकत नाही, कारण धर्मध्यानाची विशेषता वर्तत आहे. परंतु आर्तध्यान आणि रौद्रध्यान हे दोन्ही होत असतील, तर जबाबदारी स्वत:चीच आहे ना ! भगवंताने सांगितले आहे की जोपर्यंत क्रोध - मान-माया - लोभ तुमच्याजवळ शिल्लक असतील, तोपर्यंत कोणाला उपदेश करू नका.