________________
गुरु-शिष्य
१०३
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : कारण सत्य गोष्टीवर श्रद्धा बसते. बसल्याशिवाय सुटकाच नाही ना.
अडथळे थोपवितात श्रद्धेस तरी सुद्धा काही लोकांना श्रद्धा बसत नाही, त्याचे काय कारण? कारण स्वत:नेच वरून पडदे घातले आहेत. फक्त हे लोभी शेठ आणि या अहंकारी जाणकारांना श्रद्धा बसत नाही. बाकी, या मजूरांना तर लगेच श्रद्धा बसते. कारण मजूरांजवळ जाणतेपणाची मिजास नसते आणि बँकेचा लोभ नसतो. हे दोन (रोग) नसतील ते ओळखूनच घेतात. या दोन रोगामुळेच तर अडले आहे लोकांचे. 'मी जाणतो' याचे अंतराय (विघ्न) घातले आहेत. नाही तर ज्ञानी पुरुषावर तर सहज श्रद्धा बसते. स्वतःनेच हे अडथळे घातले आहेत. पार्टिशन वॉल (विभागणीची भिंत) ठेवली आहे, म्हणून! आणि फार हुशार लोक ना (!) हे काही कच्चे पडत नाहीत, परफेक्ट झाले आहेत.
आणि माझा शब्द प्रत्येक व्यक्ती, जो की देहधारी मनुष्य आहे आणि ज्याच्याजवळ बुद्धीची साधारण समज आहे, बुद्धी डेव्हलप (विकसित) झाली आहे, त्याला अवश्य कबूल करावे लागते. कारण माझा शब्द आवरण भेदी आहे, तो सगळ्या आवरणांना भेदून आत्म्यालाच पोहोचतो. आत्म्याचा आनंद उत्पन्न करेल असा आहे. म्हणजे ज्याच्यात आत्मा आहे, तो मग वैष्णव असो किंवा जैन असो किंवा कोणीही असो, जो माझे म्हणणे ऐकेल, त्याची श्रद्धा बसलीच पाहिजे. पण जर आडमुठेपणा करायचा असेल, जाणून-बुजून उलटे बोलायचे असेल, तर ती वेगळी गोष्ट आहे. आडमुठेपणा करतात ना? समजतात, जाणतात तरी देखील वाकडे बोलतात ना? हिंदुस्तानात लोक अडेलटट्ट आहेत का? तुम्ही पाहिले आहेत?
प्रश्नकर्ता : बहुतेक तसेच आहेत. दादाश्री : तो आडमुठेपणा काढायचा आहे. कोणी जाणून-बुजून