________________
या काळात अशा प्रेमाचे दर्शन हजारो लोकांना परमात्म स्वरुप दादा भगवान यांच्यात झाले. एकादा जरी कोणी त्यांची ही अभेदता चाखली असेल तो निरंतर त्यांच्या निदिध्यासनात राहतो किंवा त्यांचेच स्मरण करत राहतो, तो जरी संसारात गुरफटलेला असेल तरीही. हजारो लोक दादाश्रींना वर्षानुवर्ष एकक्षण सुद्धा विसरत नाहीत, हे या काळाचे मोठे आश्चर्यच आहे. हजारो लोक त्यांच्या सानिध्यात आले पण त्यांची करुणा, त्यांच्या प्रेमाचा वर्षाव प्रत्येकांनी अनुभवला. प्रत्येकाला असेच वाटते की माझ्यावर त्यांची सर्वात अधिक कृपा आहे, ते राजी आहेत.
आणि संपूर्ण वीतरागांच्या प्रेमाचा तर जगात दुसरा पर्यायच सापडणार नाही. एकदाच जरी वीतरागांचे, त्यांच्या वीतरागतेचे दर्शन झाले तर तिथे तो आयुष्यभर समर्पित होतो. त्या प्रेमाला तो क्षणभरही विसरु शकत नाही.
समोरच्या व्यक्तीचे आत्यंतिक कल्याण कसे होईल हेच लक्ष्य निरंतर असल्यामुळे प्रेम व करुणा फलित होताना दिसते. जगात जे कधी पाहिले नाही, ऐकले नाही, श्रद्धेत आले नाही की अनुभवलेही नाही, असे परमात्म प्रेम प्रत्यक्ष प्राप्त करायचे असेल तर प्रेम स्वरुप ज्ञानींची भजना करावी. बाकी तर हे सर्व शब्दात सामावेल असे नाही.
डॉ. नीरुबहन अमीनचे जय सच्चिदानंद
८