________________
असे जर चंदुभाऊ वर आरोप करण्यात आले तर 'तो' रागावतो त्याच्यात' स्वत:ची निर्बळता उत्पन्न होते.
तर हे रूटकॉज आहे आणि, हीच मोठी चूक आहे. दुसऱ्या सर्व चुका नाहीतच. मुळात हीच चूक आहे की 'तुम्ही' जे आहात ते ओळखत नाही आणि जे नाहीत त्याचा आरोप करता. लोकांनी नाव दिले ते तर
ओळखण्याचे साधन आहे, की 'भाऊ, हे चंदुभाऊ आहेत आणि हे इन्कमटॅक्स ऑफिसर आहेत.' हे सर्व ओळखण्याचे साधन आहे. या स्त्रीचे पती, तेही ओळखण्याचे साधन आहे. परंतु 'स्वतः खरोखर कोण आहे ?' ते जाणत नाही, त्याचीच ही सर्व अडचण आहे ना? ।
प्रश्नकर्ता : शेवटी अडचण तर तिथेच आहे ना?
दादाश्री : म्हणजे हे 'रूटकॉज' आहे. हे रूटकॉज तोडण्यात आले तरच काम होईल.
___ चांगले-वाईट हे सर्व बुद्धीवर अवलंबून असते. बुद्धीचा धंदा काय? तर जिथे जाईल तिथे प्रॉफिट आणि लॉस, फायदा आणि नुकसान बघणार. बुद्धी प्रॉफीट आणि लॉसशिवाय जास्त काम करू शकत नाही. तर आता बुद्धीपासून दूर व्हा. अनासक्त योग ठेवा. आत्म्याचा स्वभाव कसा आहे? अनासक्त स्वरूप आहे. म्हणजे स्वतःचा स्वभाव हा असा आहे. तू सुद्धा स्वभावाने अनासक्त होऊन जा. जसा स्वभाव आत्म्याचा आहे, तसाच स्वभाव आपण केला, तर एकाकार होईल, मग काही वेगळे नाहीच. फक्त स्वभावच बदलायचा आहे.
आता आपल्यात आसक्ती असेल आणि आपण भगवंतासारखे होऊ, हे कसे शक्य आहे ? भगवंत अनासक्त, मग अनासक्त आणि
आसक्तीचा मेळ कसा काय बसेल? आपल्यात क्रोध असेल तर भगवंताशी मिलन कसे होईल?
___भगवंतात जो धातू आहे, ते धातुरूप तू होऊन जा. जे सनातन आहे, तेच मोक्ष आहे. सनातन म्हणजे निरंतर. निरंतर राहते तोच मोक्ष आहे.