________________
राग 'कॉजेस', अनुराग 'इफेक्ट' प्रश्नकर्ता : परंतु दादा, राग होतो, त्यातून अनुराग होतो आणि नंतर त्यातून आसक्ती होत असते.
दादाश्री : असे आहे की, राग हे 'कॉजेस' (कारणे) आहेत, आणि अनुराग व आसक्ती हा इफेक्ट (परिणाम) आहे.
इफेक्ट बंद करायचा नाही, कॉजेस बंद करायचे. कारण ही आसक्ती कशी आहे ? एक ताई मला म्हणते, 'आपण मला ज्ञान दिले आणि माझ्या मुलालाही ज्ञान दिले आहे. तरी सुद्धा मला त्याच्यावर इतका राग (मोह) आहे की ज्ञान दिले तरी सुद्धा राग जात नाही, तेव्हा मी म्हणालो' 'ताई तो राग नाही, ती आसक्ती आहे.' तेव्हा ती म्हणाली, 'परंतु तशी आसक्ती राहायला नको ना?' ही आसक्ती 'तुम्हाला,' 'शुद्धात्माला' नाही.
दृष्टी फरकामुळे आसक्ती प्रश्नकर्ता : मनुष्याला जगाविषयी आसक्ती का असते?
दादाश्री : संपूर्ण जग आसक्तीमयच आहे, जोपर्यंत 'सेल्फ' (आत्म्या) मध्ये राहण्याची शक्ती उत्पन्न होत नाही, 'सेल्फची' रमणता उत्पन्न होत नाही. तोपर्यंत सगळे आसक्तीतच पडलेले आहेत. साधूसंन्यासी-आचार्य, सगळे आसक्तीतच पडलेले आहेत. संसाराची, बायकोची, मुलांची आसक्ती सुटली तर पुस्तकाची आसक्ती चिकटते. किंवा मग 'हम' 'हम' ची आसक्ती! म्हणजे जिथे जातो तिथे सर्व आसक्त्याच आहेत.
आसक्ती म्हणजेच विकृत प्रेम जे प्रेम कमी जास्त होते त्यास आसक्ती म्हटली जाते, आमचे प्रेम कमी-जास्त होत नाही. तुमचे प्रेम कमी-जास्त होत असते म्हणून त्यास आसक्ती म्हटली जाते. कदाचित ऋणानुबंध असलेल्या व्यक्तीसाठी प्रेम कमी-जास्त झाले तर 'आपण' त्यास 'जाणावे' आता प्रेम कमी-जास्त व्हायला नको. नाही तर प्रेम एकदम वाढले तरीही आसक्ती म्हटली जाते