________________
प्रेम
३७
दादाश्री : अपेक्षा ? प्रेमात अपेक्षाच नसते. दारू पीत असेल त्याच्यावरही प्रेम आणि दारू पित नसेल त्याच्यावरही प्रेम असते. प्रेमात अपेक्षा नसते. प्रेम सापेक्ष नसते.
प्रश्नकर्ता: परंतु प्रत्येक मनुष्याला माझ्याकरिता दोन शब्द चांगले बोलावे, माझी कदर करावी अशी अपेक्षा नेहमीच असते. शिव्या सहन करणे कोणासही आवडत नाही.
दादाश्री : स्वत:ची कदर होईल अशी अपेक्षा ठेवतो तेव्हा ते प्रेमच नाही. ती सर्व आसक्ती आहे. हा सर्व मोहच आहे.
जे लोक प्रेमाची अपेक्षा करतात ते सर्व मूर्ख आहेत, 'फुलीश' आहेत. तुमचे पुण्य असेल तर कोणी तुमच्याशी प्रेमाने बोलेल. म्हणजे त्या पुण्यामुळे प्रेम आहे, आणि जर तुमच्या पापाचा उदय झाला की तुमचा भाऊच म्हणेल, ‘तू नालायक आहेस, तू असा आहेस, तू तसा आहेस.' वाटेल तितके उपकार कराल तरीही. म्हणजे हे पुण्य आणि पापाचे प्रदर्शन आहे, आणि तुम्हाला वाटते की तोच असे करत आहे.
म्हणजे हे तर पुण्य बोलत आहे. तेव्हा यात प्रेम तर नसतेच ज्ञानी पुरुषाजवळ जाल, तेव्हा प्रेमासारखी वस्तू दिसते. अन्यथा प्रेम तर जगात कुठेही नाही.
आतील शिल्लक सांभाळा
हे तर लोक बाहेर काही वाद झाले की मैत्री तोडतात. प्रथम मैत्री असते, आणि फार प्रेमाने राहत असतात, म्हणजे बाहेर सुद्धा प्रेम आणि आत सुद्धा प्रेम! नंतर जेव्हा वाद होतो तेव्हा बाहेर सुद्धा वाद आणि आत सुद्धा वाद. आत वाद करू नये. त्याला समजणार नाही पण तरी आत प्रेम राहू द्यावे. आत प्रेम शिल्लक असेल ना, तोपर्यंत मनुष्यपण जाणार नाही. आतील शिल्लक गेली म्हणजे मनुष्यपण सुद्धा निघून जाईल.
प्रेमात संकुचितपणा नसतो
माझ्यात प्रेम असेल की नाही ? की तुम्ही एकटेच प्रेमवाले आहात ?