________________
प्रेम
३५
दादाश्री : नाही, मग शिंगे मारतात. मग आपणही शिंगे मारतो, म्हणून तो सुद्धा शिंगे मारतो, अशी लढाई सुरु होते. त्यामुळे जीवन क्लेशमय होते.
प्रश्नकर्ता : तर मग अशा परिस्थितीत आम्ही समता कशी ठेवावी ? असे जेव्हा घडते तेव्हा कसे वागावे ? काय करावे हे समजतच नाही.
दादाश्री : कुठल्या परिस्थितीत ?
प्रश्नकर्ता : आपण प्रेम ठेवावे आणि समोरची व्यक्ती समजतच नसेल, आपले प्रेम त्याला समजत नसेल. तेव्हा मग आपण काय करावे ?
दादाश्री : काय करावे ? आपण शांतच राहावे, शांत राहावे, दुसरे काय करणार? आपण काय त्याला मारायचे ?
प्रश्नकर्ता: परंतु आम्ही अजून त्या स्थितीपर्यंत पोहोचलो नाही की शांत राहू शकू.
दादाश्री : मग तेव्हा आपणही भांडायचे! दुसरे काय करणार ? पोलिस फटकारतो, तेव्हा कसे शांत राहता ?
प्रश्नकर्ता : पोलिसवाल्याची ऑथोरीटी आहे, त्याची सत्ता आहे.
दादाश्री : मग आपण त्यालाही ऑथोराइज (अधिकृत) करावे. पोलिसवाल्यांसोबत तर सरळ राहता आणि येथे मात्र सरळ राहू शकत नाही !
मुले आहेत प्रेमाचे भुकेले !
आजच्या मुलांना बाहेर जायला आवडणारच नाही असे काही करा, की घरात मुलांना आपले प्रेम, प्रेम आणि प्रेमच दिसेल. मग आपले संस्कार चालतील.
प्रेमाचा करा असा वर्षाव
तुम्ही त्याला एक टपली जरी मारली तरी तो रडायला लागेल, याचे