________________
लोक, आपली आर्य प्रजा, आपण काही अडाणी नाही, तेव्हा आपल्याकडून असे व्हायला नको. असे सर्व प्रेमाने समजवायचे तेव्हा मार्गावर येईल. आणि तुम्ही तर लेफ्ट अॅन्ड राईट, लेफ्ट अॅन्ड राईट, घेत राहता, असे कसे चालेल?
प्रेमाशिवाय परिणाम येणार नाही. एखादे रोपटे जरी वाढवायचे असेल ना, तरीही तुम्ही ते प्रेमाने वाढवले तर खूप छान वाढते. तुम्ही जर असेच पाणी टाकून आरडाओरडा कराल तर काहीही निष्पन्न होणार नाही. एक रोपटे वाढवायचे असेल तरीही! तुम्ही म्हणाल की ओहोहो, हे रोपटे तर फार छान वाढले, तर ते त्याला चांगले वाटते! मग तो सुद्धा चांगली मोठमोठी फुले देतो! मग या मनुष्यावर केवढा परिणाम होत असेल?
सांगण्याची पद्धत प्रश्नकर्ता : पण मी काय करायला हवे?
दादाश्री : आपल्या बोलण्याचा काही फायदा होत नसेल तर आपण गप्प बसावे. आपण मूर्ख आहोत, आपल्याला बोलता येत नाही, म्हणून बोलणे बंद करावे. आपले बोललेले फळत नाही आणि उलट आपले मन बिघडते, आपला जन्मही बिघडतो. असे कोण करेल?
___ म्हणजे एकाही माणसाला सुधारता येईल असा हा काळ नाही. जो स्वतःच बिघडलेला आहे तो समोरच्याला कसा सुधारेल? तो स्वत:च निर्बळ असेल तर समोरच्याला कसा सुधारेल? त्यासाठी तर बळ असले पाहिजे. म्हणजे यात प्रेमाचीच आवश्यकता आहे.
प्रेमाची पॉवर समोरच्याचा अहंकार वर येणारच नाही. आमचा आवाज सत्तावाही नसतो. सत्ता वापरु नये. मुलाला काही सांगताना तुमचा आवाज सत्तावाही नसावा.
प्रश्नकर्ता : हो, आपण म्हणाला होतात, की कोणी आपल्याकरिता दरवाजे बंद करेल त्याआधीच आपण थांबायला हवे.