________________
बसली असेल, तेव्हा जळलं मेलं ते प्रेम ! गटारात टाका त्या प्रेमास, तोंड फुगवून बसली असेल तर त्या प्रेमाचा काय उपयोग? तुम्हाला काय वाटते?
प्रश्नकर्ता : बरोबर आहे.
दादाश्री : कधीही तोंड वाकडे करणार नाही असे प्रेम असायला हवे. आणि तसे प्रेम आमच्याकडून मिळते.
नवऱ्याने झिडकारले तरी प्रेम कमी-जास्त होणार नाही, असे प्रेम हवे. हिऱ्याच्या कुड्या आणून देतो त्यावेळेस प्रेम वाढते, ती सुद्धा आसक्तीच. म्हणजे हे जग आसक्तीने चालत आहे. प्रेम तर 'ज्ञानी पुरुषांपासून' ते थेट भगवंतापर्यंत असते, त्यांच्याजवळ प्रेमाचे लाईसन्स असते. ते त्या प्रेमानेच लोकांना सुखी करतात. प्रेमानेच बांधतात म्हणून सुटू शकत नाही. ज्ञानी पुरुषांपासून ते थेट तीर्थांकरांपर्यंत सर्वच प्रेमवाले, अलौकिक प्रेम! ज्यात लौकिकता नाममात्रही नसते.
अति परिचयाने अवज्ञा जिथे जास्त प्रेम वाटते, तिथेच अरुची होते, हा मानव स्वभावच आहे. आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपल्याला ज्याच्यावर प्रेम असेल त्याचाच कंटाळा येतो. ती व्यक्ती आपल्याला आवडत नाही. 'तुम्ही जा इथून, दूर बसा' असे म्हणावे लागते. आणि पतीकडून प्रेमाची अपेक्षा करायचीच नाही आणि पतीने जर आपल्याकडे प्रेमाची अपेक्षा ठेवली तर त्याला मूर्खच म्हणावे. आपल्याला तर आपल्या कामाशी काम. हॉटेलवाल्यासोबत संसार थाटायला जातो का आपण? चहा पिण्यास हॉटेलात गेलो तर पैसे देऊन परत येतो! तसेच इथे सुद्धा आपण कामापुरते काम करून घ्यावे.
प्रेमाच्या आपुलकीत निभावतो सर्व चुका घरच्यांसोबत 'नफा झाला' असे केव्हा म्हणता येईल? तर घरच्या सदस्यांना आपल्यासाठी प्रेम वाटेल तेव्हा. आपल्याशिवाय त्यांना करमणारच