________________
प्रेम
दादाश्री : नाही, आई-वडील काही देव नाहीत, की त्यांचे एकसमान प्रेम असेल. तसे एकसमान प्रेम तर देवच ठेवू शकतो. आईवडील देव नाहीत बिचारे, ते तर आई-वडील आहेत. तेव्हा ते पक्षपाती असणारच. एकसमान प्रेम तर देवच करू शकतो. दुसरे कोणीच करू शकत नाही. माझे सर्वांवर एकसमान प्रेम असते.
बाकी, हे तर लौकिक प्रेम आहे, लोक उगाचच 'प्रेम-प्रेम' गात राहतात. बायकोवर सुद्धा प्रेम असते का ? ही सर्व स्वार्थाचीच नाती आहेत. आणि ही आई आहे ना, ती तर मोहानेच जगत असते. स्वत:च्या पोटी जन्मला म्हणून तिला मोह उत्पन्न होतो. गाईला सुद्धा मोह उत्पन्न होतो, परंतु गाईचा मोह सहा महिन्यापर्यं राहतो. आणि या आईचा मोह तर मुलगा साठ वर्षाचा झाला तरीही सुटत नाही.
प्रश्नकर्ता: परंतु आईचे बालकावर जे प्रेम असते ते निष्काम प्रेमच असते.
दादाश्री : ते निष्काम प्रेम नव्हे. आईचे बालकावर निष्काम प्रेम नसते. मुलगा मोठा झाल्यावर जर म्हणाला की, 'तू तर माझ्या बापाची बायको आहेस.' त्याक्षणी कळेल की, निष्काम प्रेम होते की नाही ? मुलगा जेव्हा म्हणतो की, 'तुझ्या बापाची बायको आहेस' त्याचक्षणी आईचा मोह ओसरतो. ती म्हणेल, ‘तू मला तोंड दाखवू नकोस.' तर आता बापाची बायको म्हणजे आई नाही का ? तेव्हा आई म्हणते, 'पण तो असे का बोलला?' तिला सुद्धा गोडवाच हवा असतो. हा सर्व मोहच आहे.
अर्थात ते प्रेम सुद्धा निष्काम नाही. ती मोहाची आसक्तीच आहे. जिथे मोह असतो आणि आसक्ती असते, तिथे निष्कामता नसते. निष्काम मोह तर आसक्तीरहित असतो.
प्रश्नकर्ता : तुमची गोष्ट तर खरी आहे. बाळ मोठा झाल्यावर अशी आसक्ती वाढते. पण बाळ जेव्हा लहान असेल, सहा महिन्याचा बाळ असेल तेव्हा ?
दादाश्री : तेव्हा सुद्धा आसक्तीच असते. दिवसभर आसक्तीच