________________
म्हणून रात्रंदिवस त्या मुलाला झोपही लागत नाही. असे घडते की नाही? त्या मुलाने जेव्हा हे जाणले की हे तर लफडेच आहे, माझे वडील सांगत होते ती खरीच गोष्ट आहे, तेव्हापासून ते लफडे सुटत गेले. म्हणजे जोपर्यंत तिला गर्लफ्रेंड म्हणेल आणि हे लफडे आहे असे त्याला वाटत नाही, तोपर्यंत कसे सुटेल?!
प्रश्नकर्ता : तर मग हा मोह आहे आणि हे प्रेम आहे याचा निर्णय करायचा असेल तर तो कसा करता येईल?
दादाश्री : प्रेम नाहीच मुळी, मग प्रेमाच्या गोष्टी कशाला करता? हे प्रेम नाहीच, हा सर्व मोहच आहे. मोह ! मूर्छित होतो. बेभान, बिलकुल भान नाही.
सिन्सियारिटी तिथे खरे प्रेम! समोरच्याकडून जरी कितीही नियम तोडले गेले, एकमेकांना दिलेले वचन हवे तितके तोडले, तरी सुद्धा सिन्सियारिटी जात नाही, सिन्सियारिटी फक्त वर्तनातूनच नाही, तर डोळ्यातून सुद्धा जाता कामा नये, तेव्हा समजावे की इथे प्रेम आहे. म्हणजे असे प्रेम शोधा. बाहेर जे चालले आहे त्यास प्रेम मानू नका. बाहेर जे चालले आहे ते सर्व बाजारू प्रेम-आसक्ती आहे, त्यामुळे विनाश होईल. पण तरी त्यातून सुटका नाही, त्यासाठी मी तुम्हाला मार्ग दाखवेल. आसक्तीत पडल्याशिवाय तर सुटकाच नाही ना!
___ भगवत् प्रेमाची प्राप्ती प्रश्नकर्ता : मग ईश्वराचे परम, पवित्र, प्रबळ प्रेम संपादन करण्यासाठी काय करायला हवे?
दादाश्री : तुम्हाला परमेश्वराचे प्रेम प्राप्त करायचे आहे ?
प्रश्नकर्ता : हो, करायचे आहे. शेवटी प्रत्येक मनुष्याचे ध्येय हेच आहे ना? माझा प्रश्न हाच आहे की, परमेश्वराचे प्रेम कसे संपादन करावे?
दादाश्री : प्रेम तर सर्वांनाच करायचे असते, पण गोड लागले तरच