________________
प्रश्नकर्ता : मग हे लोक म्हणतात ना, प्रेम शिका, प्रेम शिका.
दादाश्री : पण हे प्रेमच नाही ना! या सर्व लौकिक गोष्टी आहेत, याला प्रेम म्हणणारच कोण? लोकांचे प्रेम की जे कमी-जास्त होत असते ती सर्व आसक्ती, निव्वळ आसक्तीच आहे. जगात आसक्तीच आहे. जगाने प्रेम कधी पाहिलेच नाही. आमचे प्रेम शुद्ध प्रेम आहे, म्हणून लोकांवर परिणाम होतो. लोकांना फायदा होतो, अन्यथा फायदा होणारच नाही ना!
जेव्हा केव्हा 'ज्ञानी पुरुष' किंवा भगवंत असतील, तेव्हा प्रेम बघायला मिळते. प्रेम कमी-जास्त होत नाही, ते अनासक्त असते. ज्ञानींचे असे प्रेम तोच परमात्मा आहे. खरे प्रेम तोच परमात्मा आहे. दुसरी कोणतीही वस्तू परमात्मा नाहीच. खरे प्रेम, तिथे परमात्मापद प्रकट होते!
सदैव अघट प्रेम ज्ञानींचे प्रश्नकर्ता : मग या प्रेमाचे प्रकार किती आहेत, कसे आहेत, ते सर्व समजवा ना.
दादाश्री : प्रेमाचे दोनच प्रकार आहेत. एक आहे घटणारे-वाढणारे, घटते तेव्हा आसक्ती म्हणतात आणि वाढते तेव्हाही आसक्ती म्हणतात. आणि दुसरे घटत-वाढत नाही, असे अनासक्त प्रेम, असे प्रेम ज्ञानींचेच असते.
ज्ञानींचे प्रेम तर शुद्ध प्रेम आहे. असे प्रेम कुठेही पाहायला मिळणार नाही. जगात तुम्ही जिथेही पाहता ते सर्वच प्रेम स्वार्थवाले प्रेम आहे. पती-पत्नीचे, आई-वडिलांचे, पिता-पुत्राचे, आई-मुलाचे, शेठ-नोकराचे, प्रत्येकांचे प्रेम स्वार्थवाले आहे. ते केव्हा लक्षात येते की, जेव्हा ते प्रेम फॅक्चर होते तेव्हा. जोपर्यंत गोडवा वाटत असतो तोपर्यंत काही वाटत नाही, पण जर कटुता उत्पन्न झाली की मग समजते. अरे, आयुष्यभर वडिलांच्या आज्ञेत राहिला असेल आणि एकदाच जरी परिस्थीतिवश रागाने मुलगा वडिलांना म्हणाला की, तुम्ही बेअक्कल आहात, तर आयुष्यभराचे संबंध तुटतात. वडील म्हणतील, 'तू माझा मुलगा नाहीस, आणि मी तुझा