________________
अहिंसा
चोरून आणला आहे, म्हणून ढेकूण तुमच्याकडून त्यातले चोरून नेतात. हे सर्व हिशोब चुकते होत आहेत. तेव्हा आता त्यांना मारू नका.
__ भगवंताच्या बागेला लुटू नये असे आहे, समजा इथे एखादी बाग असेल व त्या बागेभोवती कुंपण असेल. आणि त्या कुंपणाच्या बाहेर तुरई, दुधी वगैरे लोंबकळत असतील त्याच्या मूळ मालकाच्या जागेबाहेर लोंबकळत असतील तरीही लोक काय म्हणतील? 'अरे, ही तर त्या सुलेमानची बाग आहे, तोडू नकोस. नाहीतर तो मियाँभाई मारून-मारून तेल काढेल. आणि जर कोणी आपल्या लोकांची बाग असेल तर लोक तोडून नेतात. कारण त्यांना माहीत आहे की ही बाग अहिंसक भाववाल्याची आहे. तो आपल्याला काही करणार नाही. लेट गो करेल. आणि सुलेमान तर चांगलाच चोप देईल. म्हणजे जर त्या सुलेमानच्या बागेतून एक सुद्धा तुरई किंवा दुधी घेऊ शकत नाही, मग या भगवंताच्या बागेतील ढेकूण कशाला मारता?
भगवंताच्या बागेला तुम्ही का लुटता? समजलं का तुम्हाला? म्हणून एकाही जीवाला मारू नये.
तप, प्राप्त तप प्रश्नकर्ता : पण मग ढेकूण चावतात त्याचे काय?
दादाश्रीः पण त्याचा आहारच रक्त आहे. त्याला आपण खिचडी दिली तर तो खाणार? भरपूर तूप घालून खिचडी दिली तरी तो खाणार का? नाही. कारण त्याचा आहारच 'रक्त' आहे.
प्रश्नकर्ता : पण त्याला चावू देणे हे तर योग्य नाहीच ना?
दादाश्री : पण उपास करता तेव्हा आत जी आग होते ती चालवून घ्यायची? मग हे तप करा ना! हे तप तर प्रत्यक्ष मोक्षाचे कारण आहे.