________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
नाही. जर तुम्हाला एका पत्नीने समाधान होत नसेल तर तुम्ही दोन करु शकता. त्या लोकांनी कायदा बनवला आहे. की चार पर्यंत तुम्हाला सुट आहे! आणि जर तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही सुद्धा चार करा ना? नाही कोणी सांगितले ? करु दे ना लोकांना बोंबाबोंब ! परंतु त्या(पहिल्या) पत्नीला दुःख नाही झाले पाहिजे.
70
या काळात एक पत्नीव्रताला आम्ही ब्रह्मचर्य म्हटले आहे आणि तीर्थंकर भगवान होते त्यावेळी ब्रह्मचर्याचे जे फळ मिळत होते, तेच फळ त्यांना प्राप्त होईल. याची आम्ही गॅरेंटी देतो.
प्रश्नकर्ता : एक पत्नीव्रत सांगितले, ते सूक्ष्माने की फक्त स्थळाने ? मन तर जाईल असे आहे ना ?
दादाश्री : सूक्ष्माने पण राहिले पाहिजे आणि एखाद्या वेळी मन गेले(बिघडले) तर मनापासून वेगळे राहिले पाहिजे. आणि त्याचे सतत प्रतिक्रमण करत रहावे. मोक्षाला जाण्याची लिमिट (मर्यादा) काय ? एक पत्नीव्रत आणि एक पतिव्रत. एक पत्नीव्रत किंवा एक पतिव्रताचा कायदा असेल, त्यास लिमिट म्हणतात.
जितके श्वासोच्छवास जास्त वापरले जातात, तितके आयुष्य कमी होते. श्वासोच्छवास कशात जास्त वापरले जातात ? भीतीत, क्रोधात, लोभात, कपटात आणि त्याहीपेक्षा जास्त स्त्री संगात. उचित स्त्री संगात तर खूपच वापरले जातात परंतु त्याहीपेक्षा कितीतरी अधिक अनुचित स्त्री संगात वापरले जातात. जणू काही रहाटाचा दोरखंडच उलगडत आहे, भराभर !
प्रश्नकर्ता : देवामध्ये एक पत्नीव्रत असेल का ?
दादाश्री : एक पत्नीव्रत म्हणजे कसे की संपूर्ण आयुष्य एकाच देवीसोबत काढायचे. पण दुसऱ्याची देवी पाहिल्यावर मनात असे भाव होतात की 'आपल्या देवीपेक्षा ती देवी छान आहे' असे नक्कीच वाटते परंतु जे आहे त्यात काही बदल होणार नाही.
प्रश्नकर्ता : या देवगतित मुलाचा प्रश्न नाही, तरीही तिथे विषय तर भोगतातच ना ?