________________
66
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
मजा घेतो. समजत नाही ना! नाइलाजास्तव जीव मरतील असे असले पाहिजे. पण समजच नसेल तिथे काय करणार?
हे आमचे थर्मामिटर मिळाले आहे. म्हणून आम्ही सांगतो ना की, पत्नीसोबत मोक्ष दिला आहे! आता याचा तुम्हाला जसा सदुपयोग करुन घ्यायचा असेल तसा करा! असे सरळ कोणीच दिले नाही! खूपच सरळ आणि सोपा मार्ग दाखवला आहे. अतिशय सोपा! असे घडलेच नाही! हा निर्मळ मार्ग आहे, भगवंत पण स्वीकारतील असा मार्ग आहे!
प्रश्नकर्ता : पत्नीची इच्छा नसेल परंतु पतीच्या दबावामुळे औषध प्यावे लागत असेल, तर काय करावे?
दादाश्री : पण आता काय कराल? कोणी सांगितले होते की लग्न करा?
प्रश्नकर्ता : जो भोगतो त्याची चूक. पण दादाजी असे काही औषध दाखवा की ज्यामुळे समोरच्या व्यक्तिचे प्रतिक्रमण केले, किंवा असे काही केले तर ते कमी होईल.
दादाश्री : ते तर ही गोष्ट स्वतः समजून घेतल्याने, आणि त्यालाही हे समजावल्याने की दादांनी सांगितले आहे, की हे औषध सारखे सारखे पिण्यासारखे नाही. जरा सरळ वागा ना, महिन्यातून सहा-आठ दिवस
औषध घेतले पाहिजे. आपली तब्येत चांगली राहिली, डोके चांगले राहिले तर फाईलचा निकाल करता येईल.
अर्थात आम्ही अक्रम विज्ञानात स्वतःच्या पत्नीसोबतच्या अब्रह्मचर्याच्या व्यवहाराला ब्रह्मचर्य म्हटले आहे. परंतु ते विनयपूर्वकचे असावे आणि बाहेर पण स्त्रीवर दृष्टी बिघडवायची नाही. आणि जर दृष्टी बिघडली तर लगेच (प्रतिक्रमण करुन) पुसून टाकले पाहिजे. असे असेल तर त्यास आम्ही या काळात ब्रह्मचारी म्हटले आहे. इतर कुठल्याही जागी दृष्टी बिघडत नाही, म्हणून 'ब्रह्मचारी' म्हटले आहे. याला काही असे-तसे पद म्हणतात का? आणि मग खूप कालावधी नंतर त्याच्या लक्षात येते की यातही खूप मोठी चूक आहे, तेव्हा मग तो हक्काचे विषय पण सोडून देतो.