________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
दादाश्री : हा रविवारचा उपवास कशासाठी करतो? विषयाच्या विरोधात बसला आहे. विषय विकार माझ्यापर्यंत येऊच नये, म्हणून विषयाचा विरोधी झाला, तेव्हापासूनच निर्विषयी बनला. मी सुद्धा यांना विषयाचा विरोधीच बनवित आहे. कारण त्यांच्याकडून सहजपणे विषय सुटेल असे शक्य नाही, हे तर सर्व चीभुळ (काकडी सारखे पण गोल फळ, जे पिकल्यानंतर थोडा स्पर्श करताच फुटून जाते) आहेत. हे तर दुषमकाळातील बिलबिलीत चीभुळ म्हटले जातील. यांच्याकडून काहीच सुटणार नाही, म्हणून तर मला असे दुसरे उपाय करावे लागतात ना?!
खरे म्हटले तर हे विज्ञान आहे की 'तुम्ही असे करा किंवा तुम्ही तसे करा' असे काही बोलू शकत नाही, पण हा काळच असा आहे ! म्हणून आम्हाला असे सांगावे लागते. या जीवांचा काही नेमच नाही ना? हे ज्ञान घेऊन उलट चुकीच्या मार्गावर सुद्धा जातील. म्हणूनच आम्हाला सांगावे लागते आणि तेही आमचे वचनबळ असल्यामुळे मग काही हरकत नाही. आमच्या वचनासहित(सांगण्यावरुन) करतात म्हणून त्यांना कर्तापदाची जोखिमदारी नाही ना! आम्ही सांगितले की 'तुम्ही असे करा.' म्हणून मग तुमची जोखिमदारी नाही आणि यात माझीही जोखिमदारी राहत नसते!!!
आता असे अनुपम पद सोडून उपमा असलेले पद कोण ग्रहण करेल? ज्ञान आहे तर मग जगभराच्या खरकट्याला कोण शिवेल? जगाला प्रिय असे सर्व विषय ज्ञानी पुरुषांना खरकट्यासारखे वाटतात. जगाचा न्याय कसा आहे की ज्याला लक्ष्मीसंबंधी विचार येत नसतील, विषय-विकार संबंधी विचार येत नसतील, जो देहापासून निरंतर वेगळा राहत असेल. त्याला जग 'देव' म्हटल्याशिवाय राहणार नाही!
[18 ] दादाजी देतात पुष्टि, आप्तपुत्रींना जग तर हे जाणतच नाही, की (या शरीरात) हे सर्व रेशमी चादरीत लपेटलेले आहे ? स्वतःला आवडत नाही तोच कचरा या रेशमी चादरीत (चामडीत) गुंडाळलेला आहे. असे तुम्हाला वाटते की नाही? इतके जरी समजले तरीही वैराग्यच येईल ना? इतके भान राहत नाही. म्हणून तर हे जग असे चालूच आहे ना? या भगिनींमधून अशी जागृती