________________
52
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
दादाश्री : त्यात 'स्वत:चा' विरोध असतो 'स्वत:चा' विरोध हाच तन्मयाकार न होण्याची वृत्ति. 'स्वतःला' विषयाच्या संगतीमध्ये एकाकार व्हायचेच नाही, त्यामुळे 'स्वत:चा' विरोध तर असतोच ना? विरोध राहिला हाच वेगळेपण आणि जर चुकून तन्मायाकार झाले, तर मग त्याचे प्रतिक्रमण करावे लागते.
प्रश्नकर्ता : स्वतःचा विरोध निश्चयाने तर आहेच. तरीही असे होते की, उदय असे येतात की त्यात तन्मायाकार होऊन जातो, तर हे काय आहे?
दादाश्री : विरोध असेल तर तन्मायाकार होऊच शकत नाही, आणि तन्मायाकार झालात तर 'अडखळला' असे म्हटले जाईल. जो असा अडखळतो त्याच्यासाठी प्रतिक्रमण आहेच.
त्यासाठी दोन्ही दृष्टी ठेवाव्या लागतात. तो शुद्धात्मा आहे, ही दृष्टी तर आपल्याकडे आहेच. आणि दुसरी दृष्टी (थ्री विजन) थोडेही आकर्षण झाले की लगेच ती दुसरी दृष्टी (थ्री वीजन) ठेवली पाहिजे, नाहीतर मोह उत्पन्न होतो.
पुद्गलचा स्वभाव जर ज्ञानासहित राहत असेल, तर आकर्षण होणारच नाही. परंतु पुद्गलचा स्वभाव ज्ञानासहीत राहत असेल, असे नसतेच ना कुठल्याही मनुष्याला. पुद्गलचा स्वभाव आम्हाला तर ज्ञानासहित राहतो.
प्रश्नकर्ता : पुद्गलचा स्वभाव जर ज्ञानासहित राहत असेल तर आकर्षण होत नाही, हे समजले नाही.
दादाश्री : ज्ञानपूर्वक म्हणजे असे की, कोणत्याही स्त्रीने किंवा पुरुषाने वाटेल तसे कपडे घातले असतील तरीही ते कपड्याशिवाय दिसतात, ते झाले ज्ञानासहितचे फर्स्ट विजन (पहिले दर्शन). सेकन्ड विजन (दुसरे दर्शन) म्हणजे शरीरावरुन कातडी निघालेली दिसते आणि थर्ड विजन (तिसरे दर्शन) अर्थात आतील सर्व (आतील हाड, मास, रक्त पु मळ-मुत्र वैगेरे) दिसेल. असे दिसल्यावर आकर्षण राहील का?