________________
30
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
दादाश्री : आत्तापर्यंत ज्या चुका झाल्या असतील त्यांचे प्रतिक्रमण करायचे, आणि भविष्यात पुन्हा अशा चुका होणार नाहीत असा निश्चय करायचा.
प्रश्नकर्ता : आपल्याला सामायिकमध्ये पूर्वीचे जे काही दोष झाले असतील, तेच पुन्हा-पुन्हा दिसत असतील तर?
दादाश्री : दोष दिसतात तोपर्यंत त्यांची क्षमा मागायची. क्षमापना करायची, त्याच्यासाठी पश्चाताप करायचा, प्रतिक्रमण करायचे.
प्रश्नकर्ता : आता सामायिकमध्ये बसलो, तेव्हा जे दिसले तेच सारखे सारखे का येते?
दादाश्री : ते तर येईल, आत परमाणू असतील तर येतील. त्यात आपल्याला काय अडचण आहे?
प्रश्नकर्ता : हे येतात म्हणून असे वाटते की हे धुतले गेले नाही.
दादाश्री : नाही, हा माल तर अजून खूप वेळेपर्यंत राहील. अजून दहा-दहा वर्षांपर्यंत राहील, पण तुम्हाला ते सर्व काढून टाकायचे आहे.
प्रश्नकर्ता : हे जे दोन पाने उगवताच(अंकुर फुटताच) उपटून फेकून देण्याचे विज्ञान आहे, की विषयाची गाठ फुटते तेव्हा दोन पाने उगवताच उपटून फेकावे. तर जिंकून जाऊ ना?
दादाश्री : हो, पण विषय अशी वस्तु आहे की, जर याच्यात एकाग्रता झाली तर आत्म्याला विसरतो. अर्थात ही गाठ नुकसानकारक आहे. ते यासाठीच की ही गाठ फुटते तेव्हा एकाग्रता होऊनच जाते. एकाग्रता झाली तर त्यास विषय म्हटले जाते. एकाग्रता झाल्याशिवाय विषय म्हटलाच जाणार नाही ना! ही गाठ फुटते तेव्हा इतकी सारी जागृती राहिली पाहिजे की, विचार येताच तो त्याला उपटून फेकून देईल. तेव्हा मग त्याला तिथे एकाग्रता होणार नाही. जर एकाग्रता नसेल तर ते विषयच नाही, मग ती गाठ म्हटली जाते. अणि ही गाठ जेव्हा विरघळेल तेव्हा काम होईल.