________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
नसतो. धर्म निर्विकारात असतो. थोड्या प्रमाणात जरी धर्म असला तरी चालेल परंतु धर्म निर्विकारी असायला पाहिजे.
___ प्रश्नकर्ता : गोष्ट खरी आहे, परंतु त्या विकारी किनाऱ्यापासून निर्विकारी किनाऱ्यापैंत पोहोचण्यासाठी एखादी होडी तर असायला हवी ना?
दादाश्री : हो, त्यासाठी ज्ञान असते, त्यासाठी तसेच गुरु भेटले पाहिजे. गुरु विकारी नसावेत. गुरु जर विकारी असतील तर पूर्ण समुहच नरकात जाईल. पुन्हा मनुष्यगतिही बघायला मिळत नाही. गुरूंना विकार शोभत नाही.
कोणत्याही धर्माने विकारांचा स्वीकार केलेला नाही. विकाराचा स्वीकार करणाऱ्याला वाममार्गी म्हटले जाते. पूर्वीच्या काळी वाममार्गी होते, विकारासोबत ब्रह्म शोधण्यास निघाले होते.
प्रश्नकर्ता : ते सुद्धा एक विकृत स्वरुपच म्हटले जाईल ना?
दादाश्री : हो विकृतच ना! म्हणूनच वाममार्गी म्हटले ना! वाममार्गी म्हणजे स्वतः मोक्षाला जात नाही आणि लोकांनाही मोक्षाला जाऊ देत नाही. स्वतः अधोगतित जातात आणी लोकांनाही अधोगतित घेऊन जातात.
प्रश्नकर्ता : कामवासनेचे सुख क्षणिकच आहे हे माहित असून सुद्धा, कधी तरी त्याची प्रबळ इच्छा होण्याचे कारण काय? आणि त्यावर अंकुश कशाप्रकारे ठेवू शकतो?
दादाश्री : कामवासनेचे स्वरुप जगाने जाणलेलेच नाही. कामवासना कशामुळे उत्पन्न होते, हे जर जाणून घेतले तर ताब्यात ठेवता येते. पण वस्तुस्थितीत ते कुठून उत्पन्न होते, हे जाणतच नाही. तर कसे ताब्यात ठेऊ शकणार? कोणीही ताब्यात ठेऊ शकत नाही. ज्याने ताब्यात ठेवले आहे असे जे दिसते, ते तर पूर्वी केलेल्या भावनेचे फळ आहे. कामवासनेचे स्वरुप कुठून उत्पन्न झाले, ही उत्पन्नाची अवस्था जाणली, आणि तिथेच जर टाळा लावला तरच त्यावर अंकुश ठेवू शकतो. त्याशिवाय तुम्ही