________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
झाले नाही तर संपूर्ण जग जिंकू शकाल. कारण की मग त्याची गणना शीलवानात होते. जगाचे परिवर्तन करु शकतो. तुमचे शील पाहूनच समोरच्या व्यक्तित परिवर्तन होते, नाहीतर कोणाचेही परिवर्तन होऊ शकणार नाही. उलट विपरित होईल. आता तर शीलच पूर्णपणे समाप्त झाले आहे ना !
89
चोवीस तीर्थंकरांनी एकांत शैयासन सांगितले आहे. कारण की दोन प्रकृति एकाकार, संपूर्णपणे 'एडजस्टेबल' असू शकत नाहीत. म्हणून 'डिसएडजस्ट' होतच राहतील आणि त्यामुळे संसार चालूच राहील, अंतच येणार नाही. म्हणूनच भगवंताने शोधून काढले की एकांत शैया आणि आसन.
खंड : २ आत्मजागृतीने ब्रह्मचर्याचा मार्ग
[1] विषयी - स्पंदन, मात्र जोखिम
विषयांपासून तर भगवंतही घाबरले आहेत. वीतराग भगवंत कुठल्याच गोष्टीला घाबरले नव्हते, परंतु एक विषयला मात्र ते घाबरले. घाबरले अर्थात काय की जेव्हा साप जवळ येत असेल, तेव्हा प्रत्येक मनुष्य पाय वर करुन घेतो की नाही !
[2] विषय भूकेची भयानकता
ज्याला खाण्यात असंतुष्टता असेल त्याचे चित्त जेवणात जात असते, आणि जिथे हॉटेल दिसेल तिथे चित्त चिकटत असते, परंतु फक्त खाण्याचाच एक विषय आहे का ? हे तर पाच इन्द्रिये आणि त्यात कितीतरी विषय येत असतात. ज्याला खाण्याची असंतुष्टता असेल त्याचे चित्त खाण्यात जाते. त्याच प्रमाणे ज्याला पाहण्यात असंतोष असेल तो जिथे-तिथे डोळे फिरवतच राहतो. पुरुषाला स्त्रीचा असंतोष असेल आणि स्त्रीला पुरुषाचा असंतोष असेल तर तिथे त्यांचे चित्त आकर्षित होते. याला भगवंताने मोह म्हटला आहे. पाहताच आकर्षित होतो. स्त्री दिसली की चित्त आकर्षित होते.