________________
प्रतिक्रमण
७९
झालेला आहे, ते पण पूर्ण होईल. त्यात सुटकाच नाही ना! हा तर रघा सोनाराचा तराजू (धर्मकाटा) आहे. न्याय, जबरदस्त न्याय! शुद्ध न्याय, प्युअर न्याय! त्याच्यात पोलंपोल चालत नाही.
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण केल्याने कर्माचे धक्के कमी होणार ? दादाश्री : कमी होणार ना! आणि लवकर निवाडा होणार.
प्रश्नकर्ता : ज्याची क्षमा मागायची आहे त्या व्यक्तिचा मृत्यु झाला असेल तर ते कशाप्रकारे करायचे?
दादाश्री : मृत्यु होऊन गेला असेल, तरी पण आपण त्यांचा फोटो असेल, त्यांचा चेहरा आठवत असेल, तर करता येते. चेहरा जरासुद्धा आठवत नसेल आणि नांव माहित असेल तर नांव घेवून पण करू शकता, तर त्याला सर्व पोहचून जाणार.
२३. मन आकांत करते तेव्हा... महात्मांना भाव-अभाव होत असतो पण ते निकालीकर्म आहे, भावकर्म नाही. क्रोध-मान-माया-लोभ, राग-द्वेष आणि भावाभाव ही सर्व निकालीकर्म आहेत. त्याचा समभावे निकाल करायचा आहे. ही कर्मे प्रतिक्रमण सहित निकाली होतात. असे च्या असे निकाल नाही होत.
प्रश्नकर्ता : कधीतरी आपला अपमान करून टाकला, तर तेथे मनाचा प्रतिकार चालू रहातो, वाणीचा प्रतिकार कदाचित् नाही होत.
दादाश्री : त्यावेळी काय झाले त्याची आपल्याला हरकत नाही, अरे देहाचाहि प्रतिकार होऊन गेला, तरीही. जेवढी जेवढी शक्ति असेल, त्याप्रमाणे व्यवहार होत असतो. ज्यांची संपूर्ण शक्ति उत्पन्न झालेली असेल, त्याच्या मनाचा प्रतिकारही बंद होऊन जाणार, तरीपण आपण काय म्हणतो? मनाचा प्रतिकार चालू राहो, वाणीने प्रतिकार होऊन गेला, अरे देहाचाही प्रतिकार होऊन गेला. तीनही प्रकारची निर्बलता उत्पन्न झाली तर त्या तीनही प्रकारचे प्रतिक्रमण करावे लागेल.