________________
प्रतिक्रमण
प्रकतिदोषामुळे प्रतिक्रमण नाही होत त्याची हरकत नाही. आपण तर एवढेच पहायचे आहे की, आपला भाव काय आहे? दुसरे काही आपण पहायचे नाही. तुमची इच्छा प्रतिक्रमण करण्याची आहे ना?
प्रश्नकर्ता : हा, पुरेपूर.
दादाश्री : तरीसुद्धा प्रतिक्रमण नाही होत, तर तो प्रकृतिदोष आहे. प्रकृति दोषामध्ये तुम्ही जबाबदार नाहीत. कधीकधी प्रकृति आवाज उठवेलही आणि कधी नाहीपण उठवणार, याला तर बाजा म्हणायचे, वाजला तर वाजला, नाहीतर नाहीपण वाजणार, त्याला अंतराय नाही म्हणत.
७४
प्रश्नकर्ता : समभावे निकाल' करायचा दृढ निश्चय असून सुद्धा भांडण होते, असे कशामुळे?
दादाश्री : किती ठिकाणी असे होत असते? शंभर- एक ठिकाणी ? प्रश्नकर्ता : एकच ठिकाणी होत असते.
दादाश्री : तर ते निकाचित ( असे भारी कर्म जे अवश्य भोगावे लागतात) कर्म आहे. ते निकाचित कर्म कशाने धुवावे? आलोचना, प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यानाने. त्याच्याने कर्म हलके होऊन जाते. तद्नंतर ज्ञाता-द्रष्टा रहाता येते. त्यासाठी तर प्रतिक्रमण निरंतर करावे लागते. जेवढ्या 'फोर्स'ने निकाचित झाले असेल तेवढ्याच 'फोर्स' वाले प्रतिक्रमणने ते धुतले जाईल.
प्रश्नकर्ता : आपण नक्की केले की भविष्यात असे नाहीच करायचे. अशी चुक पुन्हा नाहीच करायची. असा हंड्रेड परसेन्ट (शंभर टक्के) भाव ठेवून नक्की केले, तरीसुद्धा अशी चुक पुन्हा होणार की नाही होणार, हे आपल्या हातात आहे का?
दादाश्री : ती तर होणार ना पुन्हा. असे आहे ना की तुम्ही येथे एक चेंडू आणला आणि मला दिला, मी येथून त्याला टाकले, मी तर एकच कार्य केले, मी तर चेंडू एकच वेळा टाकला. आता माझी इच्छा नाही म्हणून मी म्हणतो की, तू बंद होऊन जा, तर तो बंद होऊन जाणार का ?