________________
प्रतिक्रमण
दादाश्री : मग थोड्यावेळा नंतर करायचे. आपण फटाक्याची वात विझवायला गेलो तेव्हा एक फटाका फूटला तर आपण परत फिरायचे. मग थोड्यावेळा नंतर विझवायचे. असे फटाकेतर फुटतच रहाणार, त्याचेच नांव संसार.
ते उलट करोत, अपमान करोत तरीसुद्धा आम्ही रक्षण करणार. एक भाऊ माझ्या बरोबर ताठ होऊन गेला. मी सर्वांना सांगितले, एक सुद्धा उल्टा विचार करु नका, एक उलटा विचार आला तर प्रतिक्रमण करायचे. तो माणूस चांगला आहे परंतु ही लोक कोणाच्या आधीन आहेत? कषायांच्या आधीन आहेत. आत्म्याच्या आधीन नाहीत ते. आत्म्याच्या आधीन असता तर असे समोर ताठ बोलला नसता. म्हणून कषायांच्या आधीन गेलेला माणूस कोणत्याही प्रकारचा गुन्हा करो ते माफ करण्याजोगे. तो स्वत:च्या आधीनच नाही बिचारा! तो कषाय करतो त्यावेळी आपण शांत राहून ढीले सोडून द्यायला पाहिजे. नाहीतर त्यावेळी सर्व उलटेच करून टाकणार. कषायच्या आधीन म्हणजे उदयकर्मच्या आधीन. जसा उदय होणार तसा फिरणार.
१७. 'मूळ' कारण अभिप्रायचे.... समोरचा किती ही चांगल्या किंवा वाईट भावनेने तुमच्या जवळ आला असेल, परंतु त्याच्या बरोबर कसे वागायचे हे तुम्ही पहायचे. समोरच्याची प्रकृति विकृत असेल तर विकृत प्रकृति बरोबर डोकेफोड करु नये. प्रकृतिनेच जर तो चोर आहे, आपण दहा वर्षापासून त्याची चोरी पाहात आहोत आणि तो येवून आपला पाया पडला तर काय आपण त्याच्यावर विश्वास करायचा? नाही, चोरी करतो त्याला आपण माफ करून देतो की तू जा आता तू सुटलास. आम्हाला तुझ्या बद्दल मनात काही नाही राहणार, परंतु त्याच्यावर विश्वास नाही करायचा आणि त्याची नंतर संगत पण नाही करायची. तरीसुद्धा त्याची संगत केली आणि मग विश्वास नाही ठेवला तर तो पण गुन्हा आहे. खरे म्हणजे संगत नाही करायची आणि केलीच तर त्याचे प्रति पूर्वग्रह रहायला नाही पाहिजे. जे घडले ते योग्य असे ठेवायचे.
प्रश्नकर्ता : तरीसुद्धा उलटा अभिप्राय होऊन गेला तर काय करायचे?