________________
५६
प्रतिक्रमण
प्रश्नकर्ता : जीवमात्र? दादाश्री : जीवमात्रला.
प्रश्नकर्ता : म्हणजे मग त्यामध्ये वायुकाय, तेउकाय, सर्व जीव येवून जातात.
दादाश्री : हे सर्व बोलले, म्हणजे त्यात सर्वच येवून जातात. प्रश्नकर्ता : काही जीवांची नकळत हिंसा होऊन गेली तर काय करायचे?
दादाश्री : नकळत हिंसा झाली परंतु जाणीव झाल्यावर त्वरितच पश्चाताप व्हायला पाहिजे, की असे नाही झाले पाहिजे. पुन्हा असे नाही होणार त्याची जागृति ठेवायची. असा आपला उद्देश ठेवायचा. भगवंताने सांगितले होते, कोणाला मारायचे नाही असा दृढ भाव ठेवायचा. कोणत्याही जीवाला जरासे पण दुःख नाही द्यायचे, अशी रोज पांचवेळा भावना करायची. माझ्या मन-वचन-कायाने कोणत्याही जीवाला किंचित्मात्र दुःख होऊ नये असे पांचवेळा सकाळी बोलून मग संसारी प्रक्रिया चालू करायची. म्हणजे जबाबदारी कमी होऊन जाते. कारणकी भाव करायचा अधिकार आहे. क्रिया आपल्या सत्ते मध्ये नाही आहे.
प्रश्नकर्ता : चुकून होऊन गेले असेल तरी पण पाप लागेल ना? दादाश्री : चुकून विस्तवात हात ठेवला तर काय होईल? प्रश्नकर्ता : भाजणार. दादाश्री : लहान बाळाचा नाही भाजणार? प्रश्नकर्ता : भाजणार.
दादाश्री : त्याचा पण भाजणार? अर्थात् काहीच सोडणार नाही. नकळत करा की जाणून करा, काहीच सोडणार नाही.
प्रश्नकर्ता : कोणी महात्माला ज्ञान घेतल्यानंतर, रात्री डास चावत असतील, म्हणून ते रात्री जागून डास मारत राहिले तर त्याला काय म्हणायचे?