________________
प्रतिक्रमण
करणे. आणि प्रत्यक्ष भेटला तर गोड बोलून क्षमा मागायची की, 'भाऊ, माझ्याने तर खूप चूका झाल्या, मी तर मूर्ख आहे, बिनअक्कलेचा आहे.' त्याच्याने समोरच्याचा घाव भरुन जाईल. आपण आपलीच निंदा केली तर समोरच्याला बरे वाटते, तेव्हा त्याचा घाव भरतात.
आम्हाला मागच्या जन्मातील झिडकारनेचे परिणाम दिसतात, म्हणून तर मी सांगतो की, कोणाशीही झिडकारून नाही वागायचे. मजूरबरोबर देखिल झिडकारून नाही वागायचे. अरे, शेवटी साप होऊन पण बदला घेईल, झिडकारण्यापासून सुटका नाही एक प्रतिक्रमणच वाचवणार.
प्रश्नकर्ता : एखाद्या माणसाला आम्ही दुःख दिले आणि त्याचे प्रतिक्रमण करून घेतले, पण त्याला जबरदस्त आघात, ठेच पोहचली असेल तर त्याच्याने आम्हाला कर्म नाही बांधणार?
दादाश्री : आपण त्याच्या नांवांने प्रतिक्रमण करीत रहायचे, आणि त्याला जितक्या प्रमाणात दु:ख झाले असेल तेवढ्याच प्रमाणात प्रतिक्रमण करायला हवे.
___ एक जज्ज (न्यायाधीश) मला म्हणाले की, 'साहेब,' तुम्ही मला ज्ञान तर दिले, आणि आता मला कोर्टामध्ये मृत्युदंडाची शिक्षा करायची की नाही ? तेव्हा मी त्याला सांगितले, त्याचे काय करणार, मृत्युदंडाची शिक्षा नाही द्यायची मग?!' ते म्हणाले, 'पण मला दोष लागेल.' मी सांगितले, 'तुम्हाला मी 'चंदुलाल' बनविले आहे की 'शुद्धात्मा' बनविले आहे?' तेव्हा ते म्हणाले, 'शुद्धात्मा' बनविले आहे. तर चंदुलाल करीत आहे त्याला तुम्ही जोखिमदार नाही. आणि जर जोखिमदार व्हायचे असेल तर तुम्ही चंदुलाल आहात. तुम्ही राजीखुशीने भागीदार होत असाल तर त्याला आमची हरकत नाही. पण भागीदार नका होऊ. मग मी त्यांना पद्धत सांगितली की, तुम्ही असे म्हणायचे की, 'हे भगवान, माझ्या वाट्याला हे काम का आले' आणि त्याचे प्रतिक्रमण करायचे, आणि गवर्मेन्टच्या कायदा प्रमाणे काम करत जायचे, समजले ना?
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण केल्याने मुक्तो होतो एवढे जर आपण लक्षात ठेवले तर सर्व लोकांना स्वच्छंदताचे लायसेन्स मिळून जाईल.