________________
३४
प्रतिक्रमण
दादा शिकवतात की, डिसऑनेस्ट (अप्रामाणिक) झाले त्याचे प्रतिक्रमण कर. पुढचा जन्म तुझा उजाळून जाईल. डिसऑनेस्टीला, डिसऑनेस्टी जाण आणि त्याचे पश्चाताप कर. पश्चाताप करणारा मनुष्य ऑनेस्ट आहे हे नक्की आहे.
आता भागीदारा बरोबर मतभेद झाला, तर लगेच तुम्हाला जाणीव होते की, हे जरूरी पेक्षा जास्त बोलले गेले, म्हणून लगेच त्याच्या नांवाने प्रतिक्रमण करायचे. आपले प्रतिक्रमण कॅश पेमेंटचे (रोख) व्हायला पाहिजे. ही बँक पण कॅश म्हणतात, आणि पेमेंट पण कॅश म्हणतात.
ऑफिसमध्ये परमिट (परवाना) घ्यायला गेलेत, पण साहेबांनी नाही दिले तर मनात वाटते की, 'साहेब नालायक आहे, असा आहे, तसा आहे' आता त्याचे फळ काय येणार आहे ते माहित नाही. म्हणून हा भाव फिरवून टाका, प्रतिक्रमण करून टाकायचे. त्याला आम्ही जागृति म्हटले आहे.
या संसारात अंतराय (विघ्न) कशाप्रकारे येत असतात ते तुम्हाला समजावतो. तुम्ही ज्या ऑफिसमध्ये काम करता, तेथे तुमच्या 'असिस्टन्ट' (सहायक)ला बेअक्कल बोललात, तोच तुमच्या अक्कलेवर अंतराय पडला ! बोला, आता या अंतरायने पूर्ण जग फसून फसून हा मनुष्य जन्म वाया घालवून टाकत आहे ! तुम्हाला 'राईट' (अधिकार) च नाही, समोरच्याला बेअक्कल बोलण्याचा. तुम्ही असे बोलतात तर समोरचा पण उलट बोलणार, त्यामुळे त्यालाही अंतराय पडणार ! बोला आता, या अंतरायापासून जग कशाप्रकारे सुटणार? कोणाला तुम्ही नालायक बोलतात तर तुमच्या लायकी वर अंतराय पडत असतो. तुम्ही त्याचे त्वरितच प्रतिक्रमण केले तर तो अंतराय पडण्या अगोदरच धुतला जातो.
प्रश्नकर्ता : नोकरीची जबाबदारी सांभाळतांना मी खूपच कठोरपणे लोकांचा अपमान केला आहे, धुतकारून काढले आहेत.
दादाश्री : ते सर्वांचे प्रतिक्रमण करायचे, त्यात तुमचा हेतू खराब नव्हता. तुमच्या स्वत:साठी नव्हता, सरकारसाठी ती सिन्सियारिटी (ईमानदारी) बोलली जाईल.