________________
प्रतिक्रमण
प्रश्नकर्ता : ज्यांनी ज्ञान घेतले नाही, त्यांना स्वत:च्या चूकां दिसतात, तर त्यांनी कशाप्रकारे प्रतिक्रमण करायचे?
दादाश्री : ज्ञान घेतले नसेल तरी पण अशी माणसे असतात. थोडी जागृत माणसे की, जे प्रतिक्रमण समजतात, ते हे करतात. दुसऱ्या लोकांचे हे कामच नाही, पण प्रतिक्रमण शब्दाचा अर्थ आपण त्यांना पश्चाताप करणे असे सांगायचे.
प्रतिक्रमण केल्याने काय होते की आत्मा आपल्या 'रिलेटिव' वर आपला दबाव टाकतो आणि अतिक्रमण म्हणजे काय झाले की 'रियल' वर दबाव टाकतो. जे कर्म अतिक्रमण आहे, आणि आता त्यात 'इंटरेस्ट' (रस) पडून गेला तर परत खाच पडल्यागत होते. जो पर्यंत आपण चुकीला चुक मानत नाही, तो पर्यंत गुन्हा आहे. म्हणून हे प्रतिक्रमण करण्याची जरूरी आहे.
प्रश्नकर्ता : माझ्याकडून अतिक्रमण होऊन गेले, त्याचे मी प्रतिक्रमण केले, पण समोरच्याने मला माफ नाही केले तर?
दादाश्री : समोरच्याचे पाहायचे नाही. तुम्हाला कोणी माफ करो की न करो, ते पाहण्याची गरज नाही. तुमच्यातून हा अतिक्रमण स्वभाव उडून जायला पाहिजे. तुम्ही अतिक्रमणच्या विरूद्ध आहे, असे होऊन जायला पाहिजे.
प्रश्नकर्ता : आणि समोरच्याला दु:ख रहातच असेल तर?
दादाश्री : समोरच्याचे काहीच पाहायचे नाही. तुम्ही अतिक्रमणच्या विरूद्ध आहात असे पक्के व्हायला पाहिजे. तुम्हाला अतिक्रमण करण्याची इच्छा नाही. तरी आता होऊन गेले त्यासाठी पस्तावा होत आहे. आणि आता तुम्हाला पुन्हा तसे करण्याची इच्छा नाही.
प्रतिक्रमण तर आम्हाला हे अभिप्राय काढण्यासाठी करायचे आहे. आता आपण या मतात राहिलो नाही. आपण या मताच्या विरूद्ध आहोत. असे दर्शविण्यासाठी प्रतिक्रमण करायचे आहे. तुला काय समजले?
प्रश्नकर्ता : जर हे निकाली आहे तर मग प्रतिक्रमण कशासाठी?