________________
प्रतिक्रमण
असतो. पण जगाला समजावयाला तर लागेल ना?! यथार्थ, खरी बात तर समजावयाला लागणार ना?!
आत्मज्ञान हा मोक्षमार्ग आहे. आत्मज्ञान झाल्यानंतरचे प्रतिक्रमण मोक्षमार्ग देणार. त्यानंतरच्या सर्व साधना मोक्षमार्ग देणार.
प्रश्नकर्ता : तर हे प्रतिक्रमण त्याला आत्मज्ञान होण्याचे कारण बनू शकते?
दादाश्री : नाही, हे जुन्याचे प्रतिक्रमण करायचे आणि पुन्हा मोहामुळे नविन अतिक्रमण उभे होतात. मोह बंद झालेला नाही ना? मोह चालू न ? *दर्शनमोह म्हणजे जुने सर्व दोष प्रतिक्रमण केल्याने विलय होऊन जातात आणि नविन (दोष) उभे होतात. प्रतिक्रमण करणार त्याक्षणी पुण्य बांधणार.
संसारी लोक प्रतिक्रमण करतात, जे जागृत असतात ते रायशी-देवशी दोन्ही प्रतिक्रमण करतात. त्याच्याने तेवढे दोष कमी होऊन जातात, परंतु जोपर्यंत दर्शन-मोहनीय आहे तोपर्यंत मोक्ष नाही होणार. दोष होतच राहतील. जेवढे प्रतिक्रमण करणार तेवढे दोष जाणार.
अर्थात्, या युगात आता 'शूट ऑन साईट'ची बात तर कुठेच गेली पण सांगितलेले आहे की संध्याकाळी, पूर्ण दिवसाचे प्रतिक्रमण करीत जा, ती बात पण कुठे राहिली, आठवड्यातून एखादे वेळी करण्याची गोष्ट पण कुठेच गेली, आणि पाक्षिक पण कुठे गेले आणि बारा महिन्यात एकदा करतो त्याची पण समज नाही आणि चांगले कपडे घालून फिरत आहे. अर्थात् असे रियल (खरे) प्रतिक्रमण कोणी करत नाही. म्हणून दोष वाढत चाललेत. प्रतिक्रमण तर त्याला म्हणावे की दोष घटतच जातात.
ह्या नीरूबहेनला तुमच्यासाठी जरासा उलटा विचार आला की 'हे पुन्हा आले आणि मला संकट का उभे केले?' मनात असा विचार आला असेल. तरी पण तुम्हाला त्याची जाणीव नाही होऊ देणार. हसतमुखी राहिल. त्या क्षणी प्रतिक्रमण करणार. उलटा विचार केला ते अतिक्रमण केले म्हणायचे. त्या रोज पाचशे-पाचशे प्रतिक्रमण करीत असतात. *दर्शनमोह (आत्मस्वरूपची अज्ञानता)