________________
प्रतिक्रमण
कर्म बांधत आहे कोण? हे आपण समजायला पाहिजे, आपले नांव काय?
मुमुक्षु : चंदुलाल.
दादाश्री : तर 'मी चंदुलाल आहे' तोच कर्म बांधणारा, मग तो रात्री झोपून गेला, तरी सुद्धा पूर्ण रात्र कर्म बांधले जातात. 'मी चंदुलाल आहे' म्हणून झोपेत सुद्धा कर्म बांधले जातात. याचे काय कारण? कारण की, हा आरोपित भाव आहे. म्हणून गुन्हा लागू झाला. स्वतः खरोखर चंदुलाल नाही. आणि जेथे तुम्ही नाही आहात तेथे 'मी आहे' असे आरोपण करत आहात. हा आरोपित भाव आहे म्हणून निरंतर त्याचा गुन्हा लागू होणार ना!! आपल्याला समजले ना?! मग मी चंदुलाल, मी याचा सासरा आहे, मी याचा मामा आहे, याचा काका आहे, हे सर्व आरोपित भाव आहेत, याच्याने निरंतर कर्मबंधन होत असते. रात्री झोपेत सुद्धा कर्म बांधले जातात. रात्री कर्म बांधले जातात, त्यातून तर आता सुटकाच नाही पण 'मी चंदुलाल आहे' या अहंकारला जर आपण निर्मल करून टाकले, तर आपले कर्म कमी बांधले जातील.
अहंकार निर्मल केल्यानंतर परत क्रिया कराव्या लागतील. कशा क्रिया कराव्या लागतील? की सकाळी आपल्या सूनेच्या हातून कपबशी फुटून गेली, यावर आपण बोलतात की 'तुझ्यात अक्कल नाही' तेव्हा तिला जे दुःख दिले, त्यावेळी आपल्याला मनात असे व्हायला पाहिजे की हे मी तिला दुःख दिले. त्याचे प्रतिक्रमण व्हायला पाहिजे. दुःख दिले त्याला अतिक्रमण म्हणावे. आणि अतिक्रमण वर प्रतिक्रमण केले तर ते धुतले जाईल. हे कर्म हलके होऊन जाईल.
तीला काही दु:ख होईल असे आचरण केले तर ते अतिक्रमण म्हणावे आणि अतिक्रमण वर प्रतिक्रमण व्हायला पाहिजे. आणि बारा महिन्यानंतर करतात तसे नाही, 'शूट ऑन साईट' (दोष पाहाता च ठार) व्हायला पाहिजे. तेव्हा ही दुःखं काहीतरी कमी होतील. वीतरागांनी सांगितलेल्या मताप्रमाणे चालतात तर दुःख जाणार. नाहीतर दुःख जाणार नाहीत.