________________
८८
प्रतिक्रमण
जोपर्यंत समोरच्याचा दोष स्वत:च्या मनात आहे तोपर्यंत चैन पडणार नाही. हे प्रतिक्रमण केले तर ते मिटून जाईल. राग-द्वेषवाली प्रत्येक चिकट 'फाईल'चा उपयोग ठेवून प्रतिक्रमण करून, स्वच्छ करायची. रागची फाईल असेल, तिचे तर खास प्रतिक्रमण करायला पाहिजे.
आपण गादीवर झोपले असाल तेव्हा जेथे जेथे खडे टोचणार तेथून काढून टाकणार की नाही काढणार? हे प्रतिक्रमण जेथे जेथे टोचत असेल तेथेच करायचे आहे. तुम्हाला जेथे टोचत आहे तेथून तुम्ही काढून टाका
आणि त्याला टोचत आहे तेथून तो काढून टाकणार! प्रतिक्रमण प्रत्येक माणसाचे वेगळे वेगळे असतात!
कोणाच्याहीसाठी अतिक्रमण झाले असेल तर, संपूर्ण दिवस त्याच्या नांवाचे प्रतिक्रमण करावे लागेल, तरच स्वतः सुटेल. जर दोघांनी समोरासमोर प्रतिक्रमण केले तर लवकर सुटका होईल. पाच हजार वेळा तुम्ही प्रतिक्रमण केले आणि पाच हजार वेळा समोरच्याने प्रतिक्रमण केले तर लवकर सुटका होईल. परंतु जर समोरच्याने प्रतिक्रमण नाही केले आणि तुम्हाला सुटायचेच असेल तर तुम्ही दहा हजार वेळा प्रतिक्रमण करायला
हवे.
प्रश्नकर्ता : जेव्हा असे काही राहून जात असते तेव्हा मनामध्ये खटकत असते की हे राहून गेले.
दादाश्री : असा क्लेश नाही ठेवायचा मग. नंतर एक दिवस बसून सगळ्यांचे एकत्र प्रतिक्रमण करावे, ज्याचे ज्याचे असेल, ओळखीवाल्यांचे, ज्यांच्या बरोबर जास्त अतिक्रमण होत असेल, त्याचे नांव घेऊन एक तास प्रतिक्रमण करून टाकले तर पूर्वीचे सगळे उडून जाईल. परंतु आपण तसे ओझे नाही ठेवायचे.
ही अपूर्व बात आहे, पूर्वी ऐकले नसेल, वाचले नसेल, जाणले नसेल, ती बात जाणण्यासाठी ही महेनत आहे.
आम्ही येथे प्रतिक्रमण करण्यासाठी बसवितो तेव्हा काय होत असते? दोन तास प्रतिक्रमण करवित असतो ना, की लहानपणापासून ते आतापर्यंत जे जे दोष झाले असतील, ते सर्व आठवून आठवून प्रतिक्रमण करायचे,