________________
पति- पत्नीचा दिव्य व्यवहार
दिलेले दुःख आपल्यालाच भोगावे लागेल. पण त्यांतर प्रतिक्रमण केल्याने जरा शांत होईल.
७६
प्रश्नकर्ता : परंतु पति-पत्नीमध्ये जरा रुसणे-रागवणे तर झालेच पाहिजे ना ?
दादाश्री : नाही, असा काही कायदा नाही. पति - पत्नीमध्ये तर खूप शांती राहिली पाहिजे. दुःख होत असेल, तर ते पति - पत्नीच नाहीत. फ्रेंडशिपमध्ये तसे होत नाही, खऱ्या फ्रेंडशिपमध्ये नाही होत. मग ही तर सर्वात मोठी फ्रेंडशिप आहे ! इथे असे व्हायला नको, हे तर लोकांनी असे बसवले आहे. स्वत:ला राग येत असतो म्हणून तर लोकांनी मारून मुटकुन असे बसवले, की नियमच असा आहे. पति-पत्नीमध्ये तर असे अजिबात झाले नाही पाहिजे. बाकी इतरत्र भले हो.
प्रश्नकर्ता : आपल्या शास्त्रात लिहिले आहे, की स्त्रियांनी पतीलाच परमेश्वर मानावे आणि त्यांच्या आज्ञानुसार चालावे. तर आता ह्या काळात ह्याचे पालन कसे करावे ?
दादाश्री : हे तर पती जर रामासारखा असेल तर आपण सीता झाले पाहिजे. पती जर वाकडे वागत असेल आणि तुम्ही वाकडे न वागून कसे होणार ? सरळ राहिलात तर उत्तम, पण सरळ रहावत नाही ना! माणूस सरळ कसा राहू शकेल, सतत हैराण करत राहिल मग! मग पत्नी काय करणार बिचारी ? अर्थात पतीने पतीधर्म पाळला पाहिजे आणि पत्नी ने पत्नीधर्म पाळला पाहिजे. कदाचित पतीच्या थोड्याफार चूका होत असल्या तरी निभावून घेईल, तिला पत्नी म्हणावे. पण हा तर घरी येऊन शिवीगाळ करु लागला तर ही पत्नी बिचारी काय करणार ?
प्रश्नकर्ता : पती हेच परमेश्वर हे काय खोटे आहे ?
दादाश्री : आजच्या पतींना परमेश्वर मानले तर ते वेडे होऊन फिरतील असे आहेत !
प्रश्नकर्ता: पतीला परमेश्वर म्हणावे ? त्याचे दररोज दर्शन करावे ? त्यांचे चरणामृत प्यावे?