________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
म्हणून ते सर्व विसरुन जातात, स्त्रिया तर बोलूनही दाखवतात, 'की त्या दिवशी तुम्ही जे काही बोललात, ते माझ्या काळजाला लागले आहे.' अरे, वीस वर्षे झाली तरी त्याची नोंद ताजी!! मुलगा वीस वर्षाचा झाला, लग्नाचा झाला तरी ती गोष्ट साठवून ठेवतेस?! सर्व वस्तू सडतील पण, ह्यांची वस्तू सडणार नाही!
स्त्रीला असे काही दिले असेल तर ते ती काळजात जपून ठेवते. म्हणून देऊ नका. देण्यासारखी वस्तू नाही ही. सावध राहण्यासारखे आहे.
नेहमीच, स्त्रीला जेवढे तुम्ही सांगाल, त्याची जबाबदारी येते. कारण की ती जोपर्यंत तुमचे शरीर चांगले मजबूत आहे, तोपर्यंत ती सहन करेल आणि मनात काय म्हणेल? सांधे ढिले पडतील तेव्हा बरोबर दाखवून देईल. ह्या सर्वांचे सांधे ढिले झाले आहेत त्या सर्वांना बरोबर दाखवून दिले आहे. हे सर्व मी पाहिले सुद्धा आहे. म्हणून मी लोकांना सल्ला देतो की बायकोशी भांडण करु नका. बायकोसोबत वैर बांधू नका. नाहीतर मेल्या भारी पडेल.
_ भारतीय स्त्री जर आपल्या मूळ संस्कारात आली, तर ती देवी आहे, पण हे तर बाहेरचे संस्कार लागले आहेत, त्यामुळे ती आता भरकटली आहे. म्हणून शास्त्रकारांनी म्हटले आहे, 'रमा रमाडवी सहेल छे, विफरी तो महामुश्केल थई जाय' आणि आपले लोक तर ती भरकटेल असे वागतात. उलट तिला अजून डिवचून उकसवतात आणि जेव्हा ती उकसवली जाते तेव्हा वाघिणी सारखी होते. म्हणून आपल्याला स्वत:च्या मर्यादे बाहेर जायला नको, मर्यादा ठेवली पाहिजे. आणि आपण जर स्त्रीला डिवचत राहिलो तर ती बिचारी कुठे जाईल? म्हणून मग ती उग्र होते, आधी उग्र होते मग बेकाबू ! आणि ती जर बेकाबू झाली की तर मग झाले! अर्थात तिला डिवचू नका. लेट गो करा.
आणि जर का स्त्री बेकाबू झाली तर तुझी बुद्धी नाही चालणार, तुझी बुद्धी तिला बांधू शकणार नाही. म्हणून ती बेकाबू होणार नाही अशारीतीने तिच्याशी बोला. डोळ्यात भरपूर प्रेम ठेवा. कधी उलट-सुलट बोलली, तर स्त्री जाती आहे असे मानून लेट गो करा. अर्थात् एका डोळ्यात भरपूर प्रेम ठेवा आणि दुसऱ्या डोळ्यात जरा सक्ती ठेवा, अशाप्रकारे राहिले पाहिजे.