________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
एक ताई आहेत, त्या मला सांगत, होत्या 'गेल्या जन्मात तुम्ही माझे वडील होता असे मला वाटते' ताई खूप चांगली, संस्कारी होती. मग मी त्या ताईनां म्हटले की, ह्या नवऱ्यासोबत कसे जुळवून घेतेस? तेव्हा ती म्हणाली, 'ते कधी काही बोलत नाही. काहीही बोलत नाही.' तेव्हा मी विचारले, 'कधीतरी, काहीतरी होत असेल ना?' तेव्हा म्हणाली, 'नाही, तसे अधून-मधून टोमणे मारतात.' हो, ह्यावरुन मी समजून गेलो. तेव्हा मी विचारले 'ते टोमणे मारतात तेव्हा तू काय करतेस? तेव्हा तू काठी घेऊन येतेस की नाही?' तेव्हा ती म्हणाली, 'नाही, मी त्यांना असे म्हणते की कर्माच्या उदयाने तुम्ही आणि मी एकत्र आलो. मी वेगळी, तुम्ही वेगळे. तर आता असे का वागता? कशासाठी टोमणे मारायचे? हे सर्व काय आहे? ह्यात कोणाचाही दोष नाही. हे सर्व कर्माच्या उदयाचे दोष आहेत. म्हणून टोमणे मारण्यापेक्षा आपण कर्म फेडून टाकूया ना! असले भांडण तर चांगले म्हणावे ना!' आतापर्यंत बऱ्याच बायका पाहिल्या पण इतकी समंजस ही एकच बाई पाहिली.
माझा मूळ स्वभाव क्षत्रिय, आमचे रक्त क्षत्रिय, त्यामुळे उपरी (मालक-वरिष्ठ)ला धमकावण्याची सवय आणि अंडर हेन्डला (हाताखालची माणसं, नोकर) सांभाळण्याची सवय. हे क्षत्रियांचे मूळ गुण, म्हणजे ही वाईफ आणि इतर सर्व अंडर हेन्ड आहेत म्हणून मला त्यांचे रक्षण करण्याची सवय होती. त्यांनी उलट-सुलट काहीही केले तरी रक्षण करण्याची सवय. नोकर असतील त्या सर्वांचे रक्षण करत होतो, त्यांची काही चूक झाली असेल तरी त्या बिचाऱ्यांना काहीही बोलत नव्हतो पण उपरी कोणी असेल तर त्याचे डोके फोडून टाकत होतो. आणि हे सर्व जगत तर अंडर हेन्डसोबत कटकट करते.
___ आपण लग्न करुन बायकोला घरी आणले आणि तिला सारखे ओरडत राहिलो, तर हे कसे आहे की गाईला खुंटीला बांधून, तिला मारणे. खुंटीला बांधून मार-मार केले तर काय होईल? इथून मारले तर त्याबाजूला जाईल बिचारी! ती एका खुंटीला बांघलेली कुठे जाणार?! ह्या समाजाची खुंट अशी जबरदस्त आहे की तिला पळून जाताही येणार नाही. खुंटीला बांधली आहे आणि तिला मारले तर खूप पाप लागेल. खुंटीला बांधलेली