________________
४४
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
पत्नी खूप सुंदर असेल, तर तो भगवंताला पण विसरेल ना! आणि पती देखणा असेल तर स्त्री पण भगवंताला विसरेल! म्हणून सर्वकाही रितसर असलेले बरे. आमचे वडिलधारी लोकं तर असे बोलत की, 'शेत ठेवा सपाट आणि पत्नी ठेवा कोबाड (कुरुप).'
लोक तर कसे आहेत की, जिथे 'हॉटेल' दिसेल तिथे 'जेवतात' अर्थात् शंका करण्यासारखे जगत नाही. शंकाच दुःखदायी आहे.
हे लोक तर 'वाईफ' जरा उशिरा घरी आली तरी शंका करतात. शंका करण्यासारखे नाही. ऋणानुबंधाच्या बाहेर काहीही होणार नाही. ती घरी आल्यावर तिला समजवा, पण शंका करु नका. शंका केल्याने उलट अधिक बिघडते. हो चेतावणी जरुर द्या, पण मनात शंका घेऊ नका. शंका करणारे मोक्ष गमवून बसतात. म्हणून आपल्याला जर सुटायचे असेल, मोक्षाला ज्याचे असेल तर शंका करु नका. कोणी परक्या माणसाला तुमच्या बायकोच्या गळ्यात हात घालून फिरताना तुम्ही जर पहिले, तर काय आपण विष खायचे?
। अर्थात्, कुठल्याही बाबतीत शंका होऊ लागली तर शंका ठेवू नका. आपण जागृत रहा, पण समोरच्यावर शंका करु नका. शंका आपल्याला मारुन टाकते. समोरच्याचे जे व्हायचे असेल ते होईल, पण आपल्याला तर शंकाच मारुन टाकेल. कारण की ही शंका तर माणसाला मरेपर्यंत सोडत नाही. शका केल्याने माणसांचा प्रभाव वाढतो का? माणूस जिवंतपणी मेल्यासारखा जगू लागतो. असे होत असते.
१२. पतीपणाचा गुन्हा प्रश्नकर्ता : कितीतरी लोकं स्त्रियांना कंटाळून घरातून पळून जातात, ते का?
दादाश्री : नाही, पळपुटे कशाला बनता? आपण परमात्मा आहोत. तर मग आपल्याला पळण्याची काय गरज आहे ? आपण तिचा समभावे निकाल करायचा.
प्रश्नकर्ता : समभावे निकाल करायचा तर कश्याप्रकारे करायचा? त्यासाठी मनात असा भाव धरायचा की हे मागच्या जन्माचे आले आहे?