________________
पति - पत्नीचा दिव्य व्यवहार
वाइफने आपले कपडे पतीच्या बॅगत ठेवले. तर दुसऱ्या दिवशी पती काय बोलेल ? माझ्या बॅगेत तू साड्या ठेवल्याच का ? ! हे आबरुदारांची मुलं ! तिच्या साड्या ह्याला खातात का! पण त्याचे स्वतःचे वेगळे अस्तित्व आहे ना! अर्थात् वाइफ आणि हजबंड, ते तर बिझनेसमुळे (लग्नामुळे) एक झाले, कॉन्ट्रेक्ट आहे हा. तर वेगळे अस्तित्व मिटून जाईल का ? अस्तित्व वेगळेच राहते. 'माझ्या पेटीत साड्या का ठेवतेस' असे बोलता की नाही बोलत ?
१८
प्रश्नकर्ता: बोलतो, बोलतो.
दादाश्री : हा तर कलह करतो की माझ्या बॅगमध्ये तुझ्या साड्या ठेवल्याच का? ह्यावर पत्नी बोलते की, कधीतरी ह्यांच्या बॅगमध्ये काही ठेवले तर असे ओरडतात. जळो, नवरा निवडण्यात माझीच चुक झाली वाटते. असा पती कुठून मिळाला ? पण आता काय करणार ? खुंटीला बांधले गेलो आहे! 'मेरी' (परदेशी स्त्री) असती तर दुसऱ्या दिवशी निघून गेली असती, पण इंडियन कशी काय जाणार? खुंटीला बांधलेल्या ! जिथे भांडण करण्याची जागाच नाही, स्पेसच नाही, अश्या ठिकाणी भांडण केले तर भांडण करण्याच्या जागेवर तर मारुनच टाकतील न ही लोक!
अरे, नाही तर जवळ-जवळ बॅगा ठेवलेल्या असतील तरी म्हणतील, तू तुझी बॅग इथून उचल. अरे मेल्या, विवाहित आहेस, लग्न केले आहेस, म्हणजे एक आहात की नाही ? ! आणि पुन्हा लिहणार काय ? अर्धांगिनी. मुर्खा, आहेस तू?! मग अर्धांगिनी कशाला लिहीतोस ? ह्यात अर्धा अंग नाही ? या बॅगमध्ये ! आपण कोणाची मस्करी करत आहोत, पुरुषांची की स्त्रियांची ? असे बोलता न ? अर्धांगिनी नाही म्हणत ?
प्रश्नकर्ता : बोलतो न.
दादाश्री : आणि बोलून पुन्हा असे पलटतात. स्त्रिया दखल करत नाही. स्त्रियांच्या बॅगेत जर कधी आपले कपडे ठेवले असेल, तर दखल नाही करत आणि ह्याला तर खूप अहंकार, नेहमी तोऱ्यातच असतो. एकदम विंचूसारखा, जरा काही झाले की पटकन नांगी मारून देईल.