________________
१४
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
भुलचूक तर सर्वांचीच होत असते ना! भुलचूक होत नाही का? भुलचूक झाली तर त्यात मतभेद का करायचे? मतभेद करायचे असेल तर बलवानासोबत भांडायचे ज्याने आपल्याला लगेच उत्तर मिळून जाईल. इथे तर लगेच उत्तर कधी मिळतच नाही. म्हणून दोघांनी समजून घ्यायचे. असे मतभेद करु नका. कोणी मतभेद पाडले तर आपण म्हणावे दादाजी काय सांगतात, मग असे का बिगडवायचे?
मतच नाही ठेवले पाहिजे. अरे! दोघांनी लग्न केले मग मत वेगळे कशासाठी? दोघांनी लग्न केले मग मतं वेगळे ठेवयाचे असतात का?
प्रश्नकर्ता : ठेवत नाही, पण ठेवले जातात.
दादाश्री : ते आपण काढून टाकावे. वेगळे मत ठेवायचे नाही. नाहीतर लग्नच नव्हते करायचे. लग्न केले तर एक व्हा.
अर्थात् हे जीवन जगता ही आले नाही! व्याकुळतेने जीवन जगत आहात! तू एकटा आहेस का? असे विचारले तर सांगेल, नाही, विवाहीत आहे. अरे मुर्खा! वाईफ आहे तरीही व्याकुळता नाही मिटली! व्याकुळता मिटायला नको का! ह्या सर्वांचा विचार तर मी आधीच केला होता. लोकांनी पण ह्याचा विचार करायला नको का? खूप मोठे विशाल जगत आहे. पण स्वत:च्या खोलीच्या आत आहे इतकेच जगत मानले आहे. अरे तिथे ही जगत आहे असे मानत असेल तरीही ठिक आहे. पण तिथेही वाईफसाबत लठेबाजी चालूच असते.
प्रश्नकर्ता : भांड्याला भांडे लागले तर आवाज होणारच पण नंतर शांतता होते!
दादाश्री : आवाज आल्यावर मजा येते खरी! 'अक्कल' चा थेंब सुद्धा नाही असेही बोलतात.
प्रश्नकर्ता : ती तर परत असेही बोलते की तुमच्याशिवाय इतर कुणीही मला आवडत नाही.
दादाश्री : हो, तसे ही बोलते!