________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
१०९ प्रश्नकर्ता : हे सांगतात की घरी पूरणपोळी खाल्ली पाहिजे. पिझ्झा खायला बाहेर नको जायला?
दादाश्री : खुशाल पुरणपोळी खा, ढोकळे खा, जिलेबी खा, सर्व काही खा. जे आवडते ते सर्व खा.
प्रश्नकर्ता : पण हॉटेलमध्ये पिझ्झा खायला जाऊ नये?
दादाश्री : पिझ्झा खायला?! ते तुम्ही कसे खाऊ शकता? आपण तर आर्य प्रजा. तरीही रुची असेल तर दोन तीन वेळा खाऊ घालून नंतर हळू हळू सोडवा. हळू हळू सोडवा. एकदम बंद केलात तर ते चुकीचे ठरेल. तुम्ही देखील त्यांच्याबरोबर खायला लागा आणि नंतर हळू हळू सोडवा.
प्रश्नकर्ता : बायकोला असे पदार्थ बनवण्याची आवड नसेल तर आपण काय करावे?
दादाश्री : तुम्ही आवड बदलून टाका. दुसऱ्या बऱ्याचशा वस्तु आहेत आपल्याकडे. आवड बदलून टाका. राई आणि मेथीची फोडणी आवडत नसेल तर दालचिनी आणि काळीमिरीची फोडणी दयायला सांगा. म्हणजे मग चविष्ट लागेल. पिझ्झ्यात खाण्यासारखे आहे तरी काय?
अर्थात् सेटींग कराल तर संपूर्ण जीवन सुरळीत जाईल आणि सकाळी अर्धा तास देवाची भक्ती कराल तर सर्व काही व्यवस्थित चालेल. तुला तर ज्ञान मिळाले, म्हणजे तू तर आता शहाणा झालास. परंतु ज्यांना ज्ञान मिळाले नाही, त्यांनी थोडी भक्ती करायला हवी ना! तुझे तर आता सर्व व्यवस्थित चालले आहे ना!
हे 'अक्रम विज्ञान' व्यवहाराला किंचितमात्र बाधारूप होत नाही. प्रत्येक 'ज्ञान' व्यवहाराचा तीरस्कार करत असते. हे विज्ञान व्यवहाराचा किंचितही तिरस्कार करत नाही स्वत:च्या 'रियालिटी' मध्ये संपूर्ण राहून व्यवहाराला तिरस्कारत नाही! व्यवहाराचा तिरस्कार नाही हीच सिद्धांतिक वस्तू आहे. सिद्धांतिक वस्तू कशाला म्हणतात तर जे कधीही असिद्धांतिक रित्या परिणमन करत नाही. त्यास सिद्धांत म्हणतात, असा कोणताही कोपरा