________________
पति- पत्नीचा दिव्य व्यवहार
एकाला ताप नसेल आणि औषध प्यायले तर वैवाहिक जीवन शोभुन दिसणार नाही. दोघांना ताप चढल्यावरच औषध घ्यावे. धिस इज द ओन्ली मेडिसिन (हे मात्र औषध आहे). औषध गोड आहे, म्हणून रोज रोज प्यायचे नसते. वैवाहिक जीवन उज्वल करायचे असेल तर, संयमी पुरुषाची गरज आहे. ह्या सर्व जनावरांना असंयमी म्हटले जाते. मनुष्य जीवन तर संयमी असायला हवे! पूर्वी जे राम-कृष्ण इत्यादी होऊन गेले, ते सर्व संयमी पुरुष होते. स्त्री सोबत संयमी ! तर असंयम हा काय दैवीगुण आहे ? हा तर पाशवी गुण आहे. मनुष्यात असे गुण नसतात. मनुष्य असंयमी नसवा. जगातल्या लोकांना समजतच नाही की विषयविकार काय आहे ! एका विषयभोगात, एकाच वेळी पाच-पाच लाख जीव मरतात, पण ह्याची समज नसल्यामुळे त्यात मजा घेतात. समजच नाही ना ! जेव्हा नाईलाजानेच अशी हिंसा होईल, असे असले पाहिजे. पण तशी समजच नसेल तर काय करणार ?
९६
सर्व धर्मांनी जटील समस्या निर्माण केली आहे की स्त्रियांचा त्याग करा. अरे, स्त्रीचा त्याग केला तर मी कुठे जाणार? मला जेवण कोण बनवून देणार? मी माझा व्यापार धंदा करु की घरी चूल पेटवु ?
वैवाहिक जीवनाची तर प्रशंसा केली आहे. शास्त्रकारांनी वैवाहिक जीवनाची निंदा केलेली नाही. लग्नाशिवाय इतर जे भ्रष्टाचार होत आहेत त्याची निंदा केली आहे.
प्रश्नकर्ता : विषयभोग संतानप्राप्ती पुरतेच असायला हवे की, बर्थ कंट्रोल (कुटुंब नियोजन) करुन विषयभोग करु शकतो ?
दादाश्री : नाही, नाही. ते तर ऋषिमुनिंच्या काळात, पूर्वी तर पतिपत्नीचा व्यवहार असा नव्हता. ऋषिमुनि लग्न करत होते, पण आधीच्याकाळी ते लग्नासाठी नाहीच बोलत असत. म्हणून मग ऋषिपत्नीने त्यांना सांगितले, की तुम्हाला एकट्याने चांगल्यापणी संसार करता येणार नाही, प्रकृती नीट राहणार नाही म्हणून आम्हा स्त्रियांची पार्टनरशीप (भागीदारी) ठेवा, त्यामुळे तुमची भक्ती ही होईल आणि संसार देखील नीट चालेल. म्हणून ह्या लोकांनी ( ऋषिमुनिंनी) मान्य केले